Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग बुधवार, 18 डिसेंबर 2019
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2019 08:31 IST2019-12-18T08:31:08+5:302019-12-18T08:31:18+5:30
आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास?

Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग बुधवार, 18 डिसेंबर 2019
आजचे पंचांग
भारतीय सौर 27, मार्गशीर्ष 1941
मिती मार्गशीर्ष वद्य सप्तमी 23 क. 31 मि.
पूर्वा नक्षत्र 24 क. 00 मि., सिंह चंद्र 29 क. 39 मि.
सूर्योदय 07 क. 06 मि., सूर्यास्त 06 क. 04 मि.
आज जन्मलेली मुलं
29 क. 39 मि. पर्यत जन्मलेली मुले सिंह राशीत राहतील. पुढील मुले कन्या राशीची असतील. विश्वास, विचार यामधून मुले कार्यप्रांतात चमकत राहतील. परिचितांचा परिवार मोठा होत राहील. प्रवास होत राहतील. माता पित्यास शुभ. सिंह राशी म, ट अद्याक्षर
- अरविंद पंचाक्षरी
दिनविशेष
1890- रेडिओचे संशोधक ई. एच आर्मस्टाँग यांचा जन्म.
1918- नाट्यचित्र समीक्षक व पत्रकार वासुदेव यशवंत गाडगीळ यांचा जन्म.
1926- तडफदार गाण्याने रंगभूमी गाजविलेले प्रसिद्ध गायक, अभिनेते सुरेश हळदणकर यांचा जन्म.
1930- कवी व समीक्षक रमेश तेंडुलकर यांचा जन्म.
1961- प्रसिद्ध क्रिकेटपटू लालचंद राजपूत यांचा जन्म.
2000- इतिहास संशोधक मुं. गो. गुळवणी यांचे निधन.
2007- प्रसिद्ध चित्रकार, मूर्तिकार सदानंद बकरे यांचे निधन.