Today's Panchang & Importance of the Day : आजचे मराठी पंचांग - मंगळवार, 17 मार्च 2020
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2020 07:31 IST2020-03-17T07:31:37+5:302020-03-17T07:31:50+5:30
आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास?

Today's Panchang & Importance of the Day : आजचे मराठी पंचांग - मंगळवार, 17 मार्च 2020
धनु राशीत जन्मलेल्या आजच्या मुलांना चंद्राचे शुक्र- हर्षलाशी प्रस्थापित होणारे शुभसंबंध आधुनिकता आणि संधी यातून नेत्रदीपक यश निर्माण करू शकतील. कला, विज्ञानाशी संपर्क तयार होऊ शकतील. माता-पित्यास शुभ. धनु राशी भ, ध अद्याक्षर
- अरविंद पंचाक्षरी
आजचे पंचांग
मंगळवार दि. 17 मार्च 2020
भारतीय सौर 27 फाल्गुन 1941
मित्ती फाल्गुन वद्य नवमी 27 क. 24 मि.
मूळ नक्षत्र 11 क. 46 मि., धनु चंद्र
सूर्योदय 06 क. 46 मि., सूर्यास्त 06 क. 48 मि.
दिनविशेष
1882 आधुनिक मराठी गद्याचे जनक, निबंधमालाकार विष्णुशास्त्री चिपळूणकर यांचे निधन
1909 संस्कृत पंडित व भारत विद्यावंत रामचंद्र नारायण दांडेकर यांचा जन्म
1910 आदिवासींच्या कल्याणार्थ झटणाऱ्या अनुताई वाघ यांचा जन्म.
1936 राजकवी चंद्रशेखर शिवराम गोऱ्हे यांचे निधन
1957 फिलिपिन्सचे तिसरे राष्ट्राध्यक्ष आणि एक थोर मुत्सद्दी रेमन मॅगसेसे यांचे निधन
1989 लोक दल(ब)चे माजी अध्यक्ष हेमवतीनंदन बहुगुणा यांचे निधन