Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग - मंगळवार, 11 फेब्रुवारी 2020
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2020 07:45 IST2020-02-11T07:45:15+5:302020-02-11T07:45:36+5:30
आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास?

Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग - मंगळवार, 11 फेब्रुवारी 2020
सिंह राशीत जन्मलेली मुले असतील, त्यानंतर कन्या राशीत मुले प्रवेश करतील. परिश्रम प्रगल्भता यामधून आजची मुले यश संपादन करतील आणि आपला व्यावहारिक प्रवाह निर्माण करतील. त्यात आकर्षकता तयार करता येईल. सिंह राशी म, ट, कन्या राशी प, ठ अद्याक्षर.
- अरविंद पंचाक्षरी
आजचे पंचांग
मंगळवार, 11 फेब्रुवारी 2020
भारतीय सौर 22 माघ1941
मिती माघ वद्य द्वितीया 06 क. 18 मि.
पूर्व नक्षत्र, 14 क. 23 मि.
सिंह चंद्र 19 क. 23 मि. पर्यत
सूर्योदय 07 क. 10 मि., सूर्यास्त 06 क. 36 मि.
दिनविशेष
1847- विद्युतप्रकाश व ध्वनी उपकरणांचे जनक थॉमस आल्वा एडिसन यांचा जन्म.
1942- उद्योगपती व गांधीवादी जमनलाल बजाज यांचे निधन.
1942- मराठी लेखिका गौरी देशपांडे हिचा जन्म.
1957- अभिनेत्री व उद्योजिका टिना अंबानी यांचा जन्म.
1968- राष्ट्रवादी साहित्यिक पंडित दीनयाळ उपाध्यय यांचे निधन.
1977- भारताचे माजी राष्ट्रपती फक्रुद्दीन अली अहमद यांचे निधन.
1993- निर्माते, लेखक कमाल अमरोही यांचे निधन.