Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग - गुरुवार, 13 फेब्रुवारी 2020
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2020 08:12 IST2020-02-13T08:12:21+5:302020-02-13T08:12:47+5:30
आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास?

Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग - गुरुवार, 13 फेब्रुवारी 2020
20 क. 23 मि. पर्यत कन्या राशीचे मुले असतील. त्यापुढे तुला राशीत मुले समाविष्ट होतील. व्यावहारिक विचार आणि आधुनिक प्रवृत्ती यामधून मुले प्रगतीचा प्रवास सुरु ठेवतील. प्राप्ती ते प्रतिष्ठा अशी वर्तुळं त्यात असतील. कन्या राशी प, ठ आद्याक्षर, तुला राशी र, त अद्याक्षर
- अरविंद पंचाक्षरी
आजचे पंचांग
गुरुवार, 13 फेब्रुवारी 2020
भारतीय सौर 24 माघ 1941
मिती माघ पंचमी 20 क. 47 मि.
हस्त नक्षत्र, 09 क. 24 मि., कन्या चंद्र 2 क. 23 मि.
सूर्योदय 7 क. 9 मि., सूर्यास्त 6 क. 37 मि.
दिनविशेष
1879- साहित्यिक, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील सरोजिनी नायडू यांचा जन्म.
1894- इतिहासकार वासुदेव सीताराम तथा वा. सी. बेंद्रे यांचा जन्म.
1901- नटवर्य भाऊराव कोल्हटकर यांचे निधन.
1911- लेनीन शांतता पुरस्कार विजेते उर्दू शायज फैज यांचा जन्म.
1936- स्वातंत्र्यसेनानी दिनशा एडलजी वाच्छा यांचे निधन.
1953- वैदिक धर्माचे परिचायक व भाष्यकार धुंडिराज गणेश बापट यांचे पुणे येथे निधन.
1968- संगीत समीक्षक गोपाळकृष्ण भोबे यांचे निधन.