Today's Panchang & Importance of the Day : आजचे मराठी पंचांग - गुरुवार, 2 एप्रिल 2020
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2020 09:26 IST2020-04-02T09:25:29+5:302020-04-02T09:26:00+5:30
कसा असेल आजचा दिवस, कसा होईल प्रवास,कशी असतील आज जन्मलेली मुलं...

Today's Panchang & Importance of the Day : आजचे मराठी पंचांग - गुरुवार, 2 एप्रिल 2020
आजचे पंचांग
गुरुवार दि. 2 एप्रिल 2020
भारतीय सौर 13 चैत्र 1942
मिती चैत्र शुद्ध नवमी, 26 क. 43 मि.
पुनर्वसू नक्षत्र 19 क. 28 मि.
मिथुन चंद्र 13 क. 33 मि.
सूर्योदय 06 क. 33 मि., सूर्यास्त 06 क. 50 मि.
श्रीरामनवमी, गुरुपुष्यामृत 19 क. 28 मि. नंतर
आज जन्मलेली मुले
13 क. 33 मि. पर्यंत जन्मलेली मुले मिथुन राशीत असतील. त्यानंतर मुले कर्क राशीच्या सहवासात राहतील. विचार आणि प्रवाह यातून कार्यपध्दतीशी समरस होऊन नियमित प्रवासात यश संपादन करत राहतील. संयम त्यात विशेष उपयुक्त ठरेल. मिथुन राशी क, छ, घ, कर्क राशी ड, ह
- अरविंद पंचाक्षरी
आजचे दिनविशेष
1840 - सुप्रसिद्ध फ्रेंच कादंबरीकार झोला एमिल यांचा जन्म
1902 - पतियाळा घराण्याचे शास्त्रीय गायक उस्ताद बडे गुलाम अली खान यांचा जन्म
1926 - प्रसिद्ध कवी सूर्यकांत रामचंद्र खांडेकर यांचा जन्म
1933 - महाराजा रणजीतसिंह यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ रणजी करंडक नावाने क्रिकेट स्पर्धा सुरू करण्यात आली
1969 - अभिनेता अजय देवगण याचा जन्म
1972 - नृत्य दिग्दर्शक रेमो डिसुझा याचा जन्म
1981 - हास्य अभिनेता कपिल शर्मा याचा जन्म
2009 - गायक संगीतकार गजानन वाटवे यांचे निधन
2011 - भारताने क्रिकेट विश्वचषक जिंकला