Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग - रविवार, 19 जानेवारी 2020
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2020 07:32 IST2020-01-19T07:31:33+5:302020-01-19T07:32:03+5:30
आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास?

Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग - रविवार, 19 जानेवारी 2020
तुला राशीतील मुलांचा प्रांत 17 क. 48 मि. पर्यंत राहील. त्यानंतर वृश्चिक राशीत मुलं प्रवेश करतील. अभिनव कार्यपद्धती आणि निर्धार यामधून आपली कार्ये यशस्वी करतील. शिक्षणात यश मिळेल. व्यवहार प्रतिष्ठा देईल. तुला राशी र, त, वृश्चिक राशी न, य अद्याक्षर.
- अरविंद पंचाक्षरी
आजचे पंचांग
रविवार, 19 जानेवारी 2020
भारतीय सौर 29 पौष 1941
मिती पौष वद्य दशमी 26 क. 52 मि.
विशाखा नक्षत्र, 23 क. 41 मि., तुला चंद्र 17 क. 48 मि.
सूर्योदय 07 क. 16 मि., सूर्यास्त 06 क. 22 मि.
दिनविशेष
1886 - शास्त्रीय गायक रामचंद्र गणेश कुंदगोळकर तथा सवाई गंधर्व यांचा जन्म
1892- विनोदी लेखक, प्राध्यापक चिंतामणी विनायक जोशी तशा चिं. वि. जोशी यांचा जन्म
1905 - रवींद्रनाथ टागोर यांचे वडील महर्षी देवेंद्रनाथ टागोर यांचं निधन
1906- अभिनेता विनायक दामोदर कर्नाटकी याचा जन्म
1960- प्रख्यात चित्रपट निर्माता, दिग्दर्शक दादासाहेब तोरणे यांचं निधन
1990- आचार्य रजनीश तथा ओशो यांचे पुणे येथे महानिर्वाण