Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग - शनिवार, 8 फेब्रुवारी 2020
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2020 09:03 IST2020-02-08T09:03:02+5:302020-02-08T09:03:29+5:30
आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास?

Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग - शनिवार, 8 फेब्रुवारी 2020
आजचे पंचाग
शनिवार, दि 8 फेब्रुवारी 2020
- भारतीय सौर 19 माघ 1941
- मिती माघ शुद्ध चतुर्दशी 16 क. 2 मि.
- पुष्य नक्षत्र 22 क. 5 मि., कर्क चंद्र 18 क. 24 मि.
- सूर्योदय 7 क.12 मि., सूर्यास्त 6 क. 34 मि.
आज जनमलेली मुलं
कर्क राशीत जन्मलेली आजची मुले वेगवान विचारांची असतील, त्यात अनेक लहरी समाविष्ट असतील. शिस्त आणि मार्गदर्शन यातून त्यावर नियंत्रण ठेवून यश स्थिर ठेवता येईल. परिवारावर प्रभाव राहील. कर्क राशी उ, ह अद्याक्षर - अरविंद पंचाक्षरी
दिनविशेष
1897 - माजी राष्ट्रपती डॉ. झाकीर हुसेन यांचा जन्म
1925 - प्रसिद्ध शास्त्रीय गायिका शोभा गुर्टू यांचा जन्म
1927 - प्रख्यात गायक बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर यांचे निधन
1936 - क्रिकेटपटू मनोहर हर्डीकर यांचा जन्म
1941 - प्रसिद्ध गझल गायक गजजित सिंह यांचा जन्म
1963 - क्रिकेटपटू माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन याचा जन्म
1995 - नौदलाचे माजी सरसेनापती भास्करराव सोमण यांचे निधन
1999 - ज्येष्ठ समाजसेवक डॉ. इंदुताई पटवर्धन यांचे निधन