Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग सोमवार, 18 नोव्हेंबर 2019
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2019 08:15 IST2019-11-18T08:14:49+5:302019-11-18T08:15:56+5:30
आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास?

Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग सोमवार, 18 नोव्हेंबर 2019
आज जन्मलेली मुलं -
कर्क राशीत जन्मलेली आजची मुलं प्रयत्नांनी प्रगती करतील. हुशारीनं त्यात व्यापकता निर्माण करतील. साहस आणि स्पर्धा यापासून मात्र शक्य तेवढे दूर राहाणे फायदेशीर राहील. माता-पित्यास शुभ. कर्क राशी ड, ह अद्याक्षर. (अरविंद पंचाक्षरी यांच्याकडून)
आजचे पंचांग
सोमवार 18 नोव्हेंबर 2019
भारतीय सौर 27 कार्तिक 1941
मिती कार्तिक वद्य षष्ठी 17 क. 10 मि.
पुष्य नक्षत्र, 22 क. 21मि., कर्क चंद्र
सूर्योदय 06 क. 11 मि., सूर्यास्त 05 क. 59 मि.
दिनविषेश
1772 - थोरले माधवराव पेशवे यांचे निधन. त्यांच्या पत्नी रमाबाई सती गेल्या.
1882 - अण्णासाहेब किर्लोस्कर लिखित 'संगीत सौभद्र'चा पहिला प्रयोग किर्लोस्कर नाटक मंडळीनं पुण्यात पूर्णानंद नाट्यमंदिरात सादर केला.
1901 - चित्रपती व्ही. शांताराम यांचा जन्म
1904 - ल. रा. पांगारकर संकलित भक्तिमार्गप्रदीप या ग्रंथाची पहिली आवृत्ती प्रकाशित
1928 - वॉल्ट डिस्ने यांच्या मिकी माऊस या प्रसिद्ध कार्टूनचा स्टिमबोट विली या चित्रपटाद्वारे जन्म