Today's Panchang & Importance of the Day: Today's Marathi Calendar, Monday, July 23, 2019 | Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग मंगळवार, 23 जुलै 2019
Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग मंगळवार, 23 जुलै 2019

आज जन्मलेली मुलं 

मीन राशीत जन्मलेली आजची मुले चंद्राचे गुरू-मंगळाशी  होणाऱ्या शुभयोगामुळे भाग्यवान ठरतील. कार्यप्रांतात प्रभाव निर्माण करतील. त्यात शिक्षणप्राप्ती, समाजकार्ये केंद्रबिंदू असतील. परदेश प्रवास संभवतात.  

- अरविंद पंचाक्षरी

आजचे पंचांग 

मंगळवार 23 जुलै 2019 

भारतीय सौर 1 श्रावण 1941

मिती आषाढ वद्य षष्ठी, 16 क. 16 मि.

उत्तरा भाद्रपदा नक्षत्र 13 क. 14 मि., मीन चंद्र

सूर्यास्त 7 क. 17 मि. 

दिनविशेष

1856 -  भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे नेते, प्राच्यविद्या पंडित, भगवदगीतेचे भाष्यकार लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म

1898 - आधुनिक बंगाली साहित्यिक आणि भारतीय ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ताराशंकर बंडोपाध्याय यांचा जन्म

1906  -  भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद यांचा जन्म

1933 -  एसएनडीटी विद्यापीठाच्या माजी कुलगुरू सुमा चिटणीस यांचा जन्म

1947 - अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांचा जन्म

2004 -  हिंदी चित्रपटातील विनोदी अभिनेते मेहमूद यांचे निधन 

 

Web Title: Today's Panchang & Importance of the Day: Today's Marathi Calendar, Monday, July 23, 2019

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.