आजचे पंचांग सोमवार, दि. ३ फेब्रुवारी २०२०भारतीय सौर १४ माघ १९४१मिती माघ शुद्ध नवमी २१ क. २० मि. कृतिका नक्षत्र २४ क. ५२ मि. मेष चंद्रसूर्योदय ०७ क. १४ मि. सूर्यास्त ०६ क. ३१ मि.
दिनविशेष
1832 क्रांतिकारक उमाजी नाईक यांना फाशी
1900 रंगद्रव्याचा शोध लावणारे रसायन शास्त्रज्ञ तिरुवेंटक शेषाद्री यांचा जन्म
1925 - विजेवरील पहिली रेल्वेगाडी मुंबई-कुर्लादरम्यान सुरू झाली
1945 - दुसऱ्या महायुद्धाचे जग या विषयावर चर्चिल व रुझवेल्ट यांच्यात माल्टा परिषद सुरू
1963 - भारतीय अर्थशास्त्रज्ञ रघुराम राजन यांचा जन्म
1966 - पहिले दूरनियंत्रक यान ल्युना-9 हे चंद्रावर कार्यरत झाले
1981 - साहित्यिक समीक्षक रा. शं. वाळिंबे यांचे पुणे येथे निधन
आज जन्मलेली मुले
वृषभ राशीत जन्मलेली आजची मुले शुक्र, शनि शुभयोगाच्या सहकार्यामुळे प्रयत्न प्रगतीचा समन्वय साधून शिक्षण, नोकरी, व्यापार, अधिकार यामध्ये प्रबलता निर्माण करू शकतील. संयमाचे संस्कार त्यावर असावे. वृषभ राशीत ब व ऊ अद्याक्षर - अरविंद पंचाक्षरी