Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग - गुरुवार, 9 जानेवारी 2020
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2020 10:25 IST2020-01-09T10:24:29+5:302020-01-09T10:25:00+5:30
आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास?

Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग - गुरुवार, 9 जानेवारी 2020
मिथुन राशीत जन्मलेली आजची मुलं चंद्र-हर्षल शुभयोगामुळे अनन्यसाधारण गुणांची असतील. त्यात बौद्धिक विभाग महत्त्वाचा ठरेल. विद्या, अधिकार, व्यवहार यात अनपेक्षित संधीतून प्रभाव निर्माण होत राहील. मिथुन राशी क, छ, घ आद्याक्षर
- अरविंद पंचाक्षरी
आजचे पंचांग
गुरुवार, 9 जानेवारी 2020
भारतीय सौर 19 पौष 1941
मिती पौष शुद्ध चतुर्दशी 26 क. 35 मि.
मृग नक्षत्र, 15 क. 38 मि., मिथुन चंद्र
सूर्योदय 07 क. 15 मि., सूर्यास्त 06 क. 16 मि.
दिनविशेष
1922- जन्मानं भारतीय असलेल्या अमेरिकन नोबेल पारितोषिक विजेते हरगोविंद खुराणा यांचा जन्म
1926- अभिनेता कल्याणकुमार गांगुली तथा अनुपकुमार यांचा जन्म
1934- प्रसिद्ध गायक महेंद्र कपूर यांचा जन्म
1947- राजस्थान विद्यापीठाची जयपूर येथे स्थापना
1951- प्रख्यात गायक, लेखक पंडित सत्यशील देशपांडे यांचा जन्म
1965- हिंदी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक फराह खान यांचा जन्म