Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग शनिवार, 19 ऑक्टोबर 2019
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2019 08:56 IST2019-10-19T08:55:45+5:302019-10-19T08:56:22+5:30
आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास?

Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग शनिवार, 19 ऑक्टोबर 2019
मिथुन राशीत जन्मलेली आजची मुले रवि-चंद्र नवपंचम योगामुळे अनेक कार्यप्रांतात स्वत:चे बस्तान बसवतील आणि व्यवहारांत व्यापक यश संपादन करू शकतील. शिक्षण, प्राप्ती, परिवार यांचा त्यात समावेश राहील.
मिथुन राशी - क, छ, घ अद्याक्षर
- अरविंद पंचाक्षरी
आजचे पंचांग
शनिवार, 19 ऑक्टोबर 2019
भारतीय सौर, 27 आश्विन 1941
मिती आश्विन वद्य पंचमी 07 क. 44 मि.
मृग नक्षत्र 17 क. 40 मि. मिथुन चंद्र
सूर्योदय 06 क. 35 मि., सूर्यास्त 06 क. 12 मि.
दिनविशेष
1902 - साहित्यिक दिवाकर कृष्ण केळकर यांचा जन्म.
1910 - भारतीय खगोल-भौतिकी शास्त्रज्ञ चंद्रशेखर सुब्रह्यण्यम यांचा जन्म.
1920 - मॅगेसेसे पुरस्कार विजेते स्वाध्याय परिवाराचे प्रवर्तक पांडुरंगशास्त्री आठवले यांचा जन्म.
1936 - प्रख्यात गीतकार शांताराम नांदगावकर यांचा जन्म.
1954 - लेखिका, अभिनेत्री प्रिया तेंडुलकर यांचा जन्म.
1956 - अभिनेता अजयसिंग ऊर्फ सनी देओल यांचा जन्म.
1970 - भारतात बनविलेले मिग जातीचे पहिले लढाऊ विमान हवाई दलात दाखल.
1995 - हिंदी चित्रपट अभिनेत्री बेबी नाझ यांचे निधन.