Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग गुरुवार, 02 मे 2019
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2019 09:42 IST2019-05-02T09:40:43+5:302019-05-02T09:42:26+5:30
आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास?

Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग गुरुवार, 02 मे 2019
आज जन्मलेली मुलं
मीन राशीत जन्मलेली आजची मुलं भाग्यातील गुरुमुळे अनेक प्रांतात चमकतील. बौद्धिक क्षेत्रात प्रभाव निर्माण करतील. उद्योगात सन्मान संपादन करतील. परदेशी प्रवास होऊ शकतील. जन्मगाव 'द', 'च' अक्षरावर राहील.
(अरविंद पंचाक्षरी यांच्याकडून)
आजचं पंचांग
गुरुवार, दि. 2 मे 2019
भारतीय सौर 12 वैशाख 1949
मिती चैत्र वद्य त्रयोदशी 27 क. 29 मी.
उत्तरा भाद्रपदा नक्षत्र 13 क. 2 मि., मीन चंद्र
सूर्योदय 06 क. 12 मि., सूर्यास्त 07 क. 00 मि.
प्रदोष
दिनविशेष
1920- प्रसिद्ध गायक, संगीत रंगभूमीवरील अभिनेते व संगीताचे व्यासंगी अभ्यासक डॉ. वसंतराव देशपांडे यांचा जन्म.
1921- आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रपट दिग्दर्शक सत्यजित रे यांचा जन्म.
1963- महाराष्ट्रातील जादूगारांचे आचार्य डॉ. के. बी. लेले यांचं निधन
1973- श्रेष्ठ मराठी समीक्षक दिनकर केशव तथा दि. के. बेडेकर यांचं निधन
1975- चित्रपट दिग्दर्शक, निर्माते, लेखक, पटकथाकार, कवी शांताराम आठवले यांचं निधन
1998- गोव्याचे काँग्रेस नेते, सामाजिक कार्यकर्ते पुरुषोत्तम काकोडकर यांचं निधन