Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग मंगळवार, 2 एप्रिल 2019
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2019 07:33 IST2019-04-02T07:32:29+5:302019-04-02T07:33:46+5:30
आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास?

Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग मंगळवार, 2 एप्रिल 2019
आज जन्मलेली मुलं कुंभ राशीची असतील. बौद्धिक प्रगल्भता चांगली असेल, नवे शोध घेणारी प्रवृत्ती राहिल. शिक्षणात त्याचा प्रभाव निर्माण होईल. व्यवहारात यश संपादन करु शकेल.
कुंभ राशी ग, स, अद्याक्षर. (अरविंद पंचाक्षरी यांच्याकडून)
आजचं पंचाग
मंगळवार, दि. 2 एप्रिल 2019
-भारतीय सौर 12 चैत्र 1941
-मिती फाल्गुन वद्य द्वादशी 08 क, 39 मि.
-शततारका नक्षत्र 24 क.49 मि,.कुंभ चंद्र
-सूर्योदय 06 क.34 मि., सूर्यास्त 06 क. 52 मि.
-भौम प्रदोष
दिनविशेष
1902 - पतियाला घराण्याचे प्रख्यात गायक बडे गुलाम अली खाँ यांचा जन्म
1933 - प्रसिद्ध क्रिकेटपटू महाराजा के.एस.रणजितसिंह यांचे निधन. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ रणजी करंडक या नावाने क्रिकेट स्पर्धा सुरु करण्यात आल्या.
1969 - अभिनेता अजय देवगण यांचा जन्म
1974 - प्रख्यात नृत्यदिग्दर्शक, अभिनेता रेमो डिसूजा यांचा जन्म
1981 - प्रसिद्ध हास्य अभिनेता कपिल शर्मा यांचा जन्म
2009 - गायक, संगीतकार गजानन वाटवे यांचे निधन