Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग मंगळवार, 19 फेब्रुवारी 2019
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2019 09:11 IST2019-02-19T08:49:32+5:302019-02-19T09:11:36+5:30
आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास?

Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग मंगळवार, 19 फेब्रुवारी 2019
11 क. 03 मि. पर्यंत जन्मलेली मुलं कर्क राशीत राहतील. त्यानंतर सिंह राशीत मुलं समाविष्ट होतील. प्रयत्नाने प्रवाहाशी समरस होणारी मुलं आकर्षक यश संपादन करतीव. बुध-नेपच्यून युती प्रलोभनातून फसवते याचे स्मरण ठेवा.
कर्क राशी ड, ह, सिंह राशी म, ट आद्याक्षर.
(अरविंद पंचाक्षरी यांच्याकडून)
आजचं पंचांग
मंगळवार, दि. 19 फेब्रुवारी 2019
- भारतीय सौर 30 माघ 1940
- मिती माघ शुद्ध पौर्णिमा, 21 क. 24 मि.
- आश्लेषा नक्षत्र 11 क. 03 मि., कर्क चंद्र 11 क. 03 मि.
- सूर्योदय 07 क. 06 मि., सूर्यास्त 06 क. 39 मि.
दिनविशेष
छत्रपती शिवाजी महाराज जयंती (तारखेप्रमाणे)
1906 - दुसरे सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांचा जन्म.
1915 - स्वातंत्र्यसेनानी, समाजसुधारक नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांचे निधन.
1919 - कथाकार अरविंद गोखले यांचा इस्लामपूर (सांगली) येथे जन्म.
1956 - गणिततज्ञ, संशोधक केशव लक्ष्मण तथा भाऊजी दफ्तरी यांचे निधन.
1956 - स्वातंत्र्यसेनानी आचार्य नरेंद्र देव यांचे निधन.
1978 - संगीतकार, गायक पंकज मलिक यांचे निधन.
1997 - संगीतकार राम कदम यांचे निधन.
2003 - अभिनेते अनंत मराठे यांचे निधन.