शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
3
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
4
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
5
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
6
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
7
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
8
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
9
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
10
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
11
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
12
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
13
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
14
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
15
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
16
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
17
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
18
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
19
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
20
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय

गुरूंच्या सेवेतूनच मनातील इच्छा पूर्ण होतात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 09, 2021 2:24 PM

जे शहाणे आहेत त्यांनी श्री गुरूंची सेवा करावी. म्हणजे त्यांच्या मनातील सर्व हेतू सिध्दीस जातील. यासाठी सर्वांनी गुरूंची सेवा करणे गरजेचे आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांनी पुढील ओवीमध्ये गुरूसेवेबद्दल काय सांगितले वाचा.. 

म्हणोनि जाणतेने गुरू भजिजो । तेणे कृतकार्य होई जे । जैसे मूळ सिंचने सहजे ।शाखा पल्लव संतोषती ।।(ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक १, ओवी क्रमांक २५)

ज्ञानेश्वर महाराजांनी या ओवीमध्ये सांगितले आहे की, जे लोक रूप, रस, गंध, स्पर्श, शब्द व काम, क्रोध, शोक, मोह, भय, षडकिराने विलीन होतात. त्याच्याविषयी सांगितले आहे.

पामर- जे लोक पाप व पुण्य याचा विचार करत नाही. धर्म व अधर्म याचा विचार करीत नाहीत व तामस वृत्तीने आपल्या म्हणण्याप्रमाणे आचरण करतात. त्याला पामर असे ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटले आहे. याचे  उदाहरण द्यायचे झाले तर आज सध्या मद्यपान करणारे, मांसाहार करणारे, अधर्माने वागणारे समाजात बरेच लोक आहेत. 

रूप- पतंग दिव्याचा प्रकाश पाहून त्यावर झडप घालतात आणि मरतात. 

रस- मासे मारणारे कोळी मासे मारण्याच्या आपल्या लोखंडी गळाचे आकडे एकत्र जमवून त्यावर आमिष म्हणून काही तरी खाण्याचा पदार्थ बांधून तो गळ पाण्यात सोडतात. लगेच पाण्यातील मासे त्या पदार्थाच्या आषिलाषेने त्या पदार्थातच म्हणजे लोखंडी गळासच आपले तोंडे खुपसून मरण पावतात. यासाठी रस हा विषय दु:खाचे कारण आहे.

गंध- एखाद्या सूर्य विकासी प्रफुल्लीत कमळावर एखादा भ्रमर सुंगधाच्या आभिलाषेने बसून राहतो. सूर्यास्ताबरोबर ते कमळ मिटते. तथापी तो सुवासच्या लोभाने त्यातून बाहेर पडत नाही. काही वेळाने तेथे हत्ती येऊन कमळ उपटून खाऊन टाकतो. याचा अर्थ कमळाबरोबर भ्रमर मरण पावतो म्हणून गंध विषय दु:खाला कारण बनतो.

स्पर्श- हत्ती पकडणारे एक हत्तीण लाकडी बनवितात. तिला रंग देतात व खड्डा करतात. हत्ती हत्तीणीला पाहून अशक्त होतो. खड्ड्यात जाऊन पडतो. याचा अर्थ असा की, अशक्त होऊन हत्ती नाश पावतो. स्पर्श विषय दु:खाला कारण होतो. 

शब्द-  एकदा एक लबाड सुस्वर कंठाचा पारधी रानात मुद्दाम सुस्वर गाऊ लागतो. त्याच्या गाण्याला नादवून हरीण फाश्यामध्ये अडकते व मरण पावते. याचा अर्थ असा की, शब्द हा विषय दु:खाला कारण बनतो. 

रिकामा- याबाबत संत ज्ञानेश्वर महाराज सांगतात, या वर्गाला काहीच न करण्याची इच्छा असते, त्या वर्गाला रिकामा असे म्हटले जाते. 

जिज्ञासा- या वर्गाला ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटले आहे की, हे लोक धर्म व अधर्म, पाप व पुण्य हे जाणून धर्माने वागतात. गुरूंची सेवा करतात. आचरण चांगले असते म्हणून महाराजांनी त्याला जिज्ञासू असे म्हटले आहे. 

या सर्वाचा सार असा आहे की, जे गुरूची सेवा करतात. त्यांची सर्व इच्छा भगवान (देव) पुरी करतो. त्यासाठी महाराजांनी झाडाच्या मुळाला पाणी घातले की झाडांची पाने आपोआप टवटवीत होतात, असे म्हटले आहे. याचे उदाहरण द्यायचे झाले तर प्रभू रामचंद्रांनी विश्वमित्र वशिष्ठऋषींची सेवा केली. भगवान श्रीकृष्णाने संदीपनऋषींची सेवा केली. 

-गोरक्षनाथ महाराज शिंदेदत्त मंदिर प्रमुख, तळवडी (ता. कर्जत), जि. अहमदनगर.(९८५०९५६८२७) 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरKarjatकर्जतAdhyatmikआध्यात्मिक