बोल ना हलके हलके... ! 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2020 09:21 PM2020-03-21T21:21:01+5:302020-03-21T21:21:12+5:30

विचारांची देवाणघेवाण झाली नाही की मनात विकृती निर्माण होऊन डिप्रेशन येते .

Talk more time...! | बोल ना हलके हलके... ! 

बोल ना हलके हलके... ! 

Next

डॉ.दत्ता कोहिनकर- 
मठात ब्रम्हचर्य व्रताची दीक्षा घेतलेल्या संजयने स्वत: ला न जाणता कामभावनांचे दमन केले. पण एका दिवशी एका सुंदर युवतीकडे तो ओढला गेला. त्याला वाटले की त्याच्याकडून व्याभिचार घडला . ही अपराधीपणाची भावना मनातच दाबून ठेवल्याने संजयला डिप्रेशन आले.स्ट्रेस मॅनेजमेंटच्या कार्यशाळा मी घेतो हे त्याने फेसबुक वर वाचले व मला फोन केला . फोनवर मी त्याला पूर्णतः बोलून मोकळे केले व  मनात घर करून बसलेल्या त्याच्या अपराधीपणाच्या विचारांना दूर सारले . व सहज ब्रम्हचर्य झेपत नसेल तर गृहस्थाश्रमात येण्याचा सल्ला दिला. मित्रांनो अपराधीपणाची भावना मनात ठेवून जगू नका. समजा कुकरमध्ये खूप वाफ कोंडली व शिट्टी दाबूनच ठेवली तर त्याचे काय होईल ? अर्थात स्फोटच. पाण्याला वाहण्याचा मार्ग बंद केला तर ते पाणी आतल्या आत रापून त्याला दुर्गंधी सुटेल . मानवी मनाचे असेच असते. भावनांना वाट मिळाली नाही. विचारांची देवाणघेवाण झाली नाही की मनात विकृती निर्माण होऊन डिप्रेशन येते . म्हणून संवाद हा अत्यंत आवश्यक असतो. तो मनाचा आहार आहे. संवादामुळे मन मोकळे व हलके होते . विचारांच्या देवाणघेवाणीमुळे विचारांना नवा आयाम मिळतो. आपलं मानसिक संतुलन चांगलं राहतं. थोडक्यात कुकरची शिट्टी दाबू नका. योग्य वेळी योग्य प्रकारे बिनधास्त व्यक्त व्हा . संपन्न व्यक्तीमत्त्वासाठी व निरोगी मनासाठी संवाद आवश्यक असतो .तुम्ही मनातच गोष्टी दाबून ठेवल्या तर, शरिरावर व मनावर त्याचा दुष्परिणाम होतो.मनांत दाबून ठेवलेली उर्जा बाहेर पडण्यासाठी धडपडत असते. मग पाय हलविणे, मुठी आवळणे, आळोखे पिळोखे देणे अशा क्रिया आपोआप घडू लागतात. तुम्ही स्व:ताचे निरीक्षण करा, तुम्ही खुर्चीवर बसला आहात, पाय आपोआप हलत आहेत, बेडवर पाय आपोआप आपटले जातात . एखाद्याचा खूप राग आला पण तुम्ही तो व्यक्त करू शकला नाहीत. त्या नकारात्मक उर्जेला तुम्ही योग्य रितीने वाट करून दिली नाही तर हळूहळू ती उर्जा शरिरावर व मनावर नकारात्मक परिणाम करते. त्यातून मानसिक व शारिरीक व्याधींना सुरवात होते. आपल्याला कधी कधी भांडावेसे वाटते, मारामारी करावीशी वाटते, 

शिवीगाळ करावीशी वाटते,यांचे कारण काय?       
 तर आत कोंडलेली उर्जा बाहेर पडण्यासाठी धडपडत असते. कधी ओरडावेसे वाटले, मारावेसे वाटले तर उशीवर गुद्दे मारा, नाचावेसे वाटले तर नाचा, रडावेसे वाटले तर रडा, हसावेसे वाटले तर बिनधास्त हसा. भाव-भावनांचे योग्य रितीने व्यवस्थापन करण्यासाठी, अमेरिकेतील हार्वे जॅकिन्स यांनी 1950च्या दशकामध्ये पुनर्मूल्यांकन सह समुपदेशनाचे समूहगट चालू केले. आज संपूर्ण जगात हे गट कार्यरत आहेत. भावभावनांचे व्यवस्थापन योग्य रितीने कसे करायचे यामध्ये शिकवले जाते. मित्रांनो जीवन सुंदर आहे. मनांसारखे आनंदाने, नैतिकतेने प्रेमाने जगा. भावनांचे दमन न करता योग्य नैसर्गिक मार्गाने शमन करा. मोकळे होण्यासाठी तुम्ही स्वमनाला एवढंच सांगा , " बोल ना माही बोल ना .
 

Web Title: Talk more time...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.