‘‘पैसा"

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2019 08:56 PM2019-07-20T20:56:14+5:302019-07-20T20:58:39+5:30

पैशांनी मोठे पद मिळते पण मनापासूनचा आदर मिळवू शकत नाही. पैशांनी आपण मखमली गादी घेऊ शकतो, पण शांत झोप नाही. पैशांनी पुस्तके आपण घेऊ शकतो, पण विदया नाही.

spiritual thought about over craziness about money | ‘‘पैसा"

‘‘पैसा"

Next

-दत्ता कोहिनकर

अमेरिकेहून मुलगा व सुन भारतात आली व आपल्याबरोबर आई-वडलांनी अमेरिकेलाच स्थायिक व्हावे म्हणून प्रेमाने - गोडी गुलाबीने राहता बंगला त्यांना विकावयास लावला. पैसे आपल्या खात्यात भरले व विमानतळावर आई-वडलांना सोडून दोघेही अमेरिकेला निघून गेले. एका समाजसेवकाच्या मदतीने हे दोघे आई-वडिल आज अनाथालयात दिवस काढत आहेत. दुसरी घटना केतकी वेळ घेऊन भेटायला आली होती. नवरा नुसते पैसे कमव तुला जे करायचं ते कर पण पैसे आण म्हणून त्रास देत होता. सांगताना तिचे डोळे पाणावले होते. अजुन एक घटना रूपेशला घटस्फोट मिळवण्यासाठी त्याच्या पत्नीने लाखो रूपायंची मागणी करून त्याला बेजार केले होते. पैशासाठी आई-वडिल, पत्नी-पती या पवित्र नात्यांवर अशाप्रकारे आभाळ कोसळले होते. ‘‘ना बाप बडा - ना भय्या, द होल थींग इज दॅट ना मैय्या, सबसे बडा रूपय्या ।’’ या गाण्याची प्रचिती वरील उदाहरणावरून येते. काही लोक म्हणतात ‘‘काय पैसापैसा करतो, मेल्यानंतर वर नेणार काय ?’’ पण हे ही तितकच खरं आहे.

जोपर्यंत मनुष्य जिवंत असतो तोपर्यंत त्याच्याजवळचा पैसा त्याला प्रत्येक क्षेत्रात वर नेत असतो. दरिद्री माणसाला समाज दूर ठेवतो. त्याचा फोन नंबर यादीतून वगळला जातो. श्रीमंत माणूस बुध्दीने व शिक्षणाने कमी असला तरी समाजात त्याचा नावलौकिक असतो. गोवर्धनदास म्हणाले होते मी जन्म कुठे घ्यावा हे माझ्या हातात नव्हते. त्यामुळे मी जरी गरीब घरात जन्म घेतला. तरी मी गरीब म्हणून मरणार नाही. खरोखर मित्रांनो शेवटी सगळया गोष्टी पैशाशी संबंधित असतात. त्यामुळे अर्थतज्ञ म्हणतात ‘‘जर रूपयाचा हिशोब ठेवाल काटेकोर - तर आयुष्याचं गणित सहज सोडवेल परमेश्‍वर.’’ त्यामुळे आयुष्याचं गणित सहज सोडविण्यासाठी पैशाचे महत्व अनन्यसाधारण आहे, कारण या जगात सगळया गोष्टी भरलेल्या पोटानेच होतात. पण खरोखर सगळयाच गोष्टी पैशाने मिळवता येतात का? यावर सखोल चिंतन करणे गरजेचे आहे. पैशांसाठी लोक   स्वकीयांना धोका देतात, आत्मसन्मान गहाण ठेवतात. देहविक्री करतात, खोटयाला खरे म्हणतात, अपराध करतात, जीव घेतात, नाती सोडतात, वाटेल ते करतात. येथूनच दुःखचक्राला सुरूवात होते. मित्रांनो पैसा महत्वाचा आहेच पण या पैशांनी आपण घर घेऊ शकतो. पण घराला घरपण आणू शकत नाही. पैशांनी औषध आणू शकतो, पण आपण आपले वय वाढवू शकत नाही. पैशांनी घडयाळ मिळते, पण गेलेली वेळ मिळवू शकत नाही.

पैशांनी मोठे पद मिळते पण मनापासूनचा आदर मिळवू शकत नाही. पैशांनी आपण मखमली गादी घेऊ शकतो, पण शांत झोप नाही. पैशांनी पुस्तके आपण घेऊ शकतो, पण विदया नाही. पैशांनी रक्त पण विकत मिळते पण कोमजून गेलेले जीवन नाही. म्हणून पैसा अवश्य कमवा पण चांगल्या मार्गाने. आणि सत्मार्गाने कमावलेल्या पैशाच्या 10 % रक्कम ही दानधर्मासाठी खर्च करा व नाती-मैत्री व धन यांचा सुरेख संगम साधा व यांचा समन्वय साधताना लक्ष्मीकडे देखील दुर्लक्ष करू नका. म्हणतात ना, *‘‘वासुदेवाची ऐका कहानी, जगात नाही राम रे दाम करी काम वेडया - दाम करी काम रे 

Web Title: spiritual thought about over craziness about money

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.