शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

आकाश : एक अमर्याद संभावना

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2019 05:19 IST

शहरांमध्ये राहणारे लोक हल्ली आकाशाकडे पाहतसुद्धा नाहीत. ते ट्यूबलाइटच्या प्रकाशातच रमलेले असतात. तुम्ही सर्व दिवे बंद करून रात्री आकाशाकडे टक लावून पाहिलेत तर तुमच्या लक्षात येईल की ती एक अमर्याद संभावना आहे.

- सद्गुरू जग्गी वासुदेवशहरांमध्ये राहणारे लोक हल्ली आकाशाकडे पाहतसुद्धा नाहीत. ते ट्यूबलाइटच्या प्रकाशातच रमलेले असतात. तुम्ही सर्व दिवे बंद करून रात्री आकाशाकडे टक लावून पाहिलेत तर तुमच्या लक्षात येईल की ती एक अमर्याद संभावना आहे. ती एक अशी अनाकलनीय, अविश्वसनीय आणि अगदी रहस्यमय गोष्ट आहे की हे रहस्य उलगडण्याचा कोणताही मार्गच नाही. तुम्ही कधीच असे म्हणू शकत नाही की तुम्ही त्याबद्दल थोडेफार जाणता. जेव्हा तुम्हाला त्याबद्दल काहीसे माहीत झाले आहे असे वाटते, त्याच क्षणी तुमच्या लक्षात येते की आकाशाबद्दल अनेक माहीत नसलेल्या गोष्टी तुमच्या प्रत्ययाला येतात. आणि तुम्ही पाहाल, आकाशाबद्दल तुम्हाला नकळलेल्या गोष्टी; कळलेल्या गोष्टींपेक्षा लक्षावधी पटीने जास्त आहेत. हेच आकाशाचे अद्भुत सौंदर्य आहे. आकाश ही एक आध्यात्मिक प्रक्रिया आहे कारण ती एक अमर्याद शक्यता आहे. ते जाणून घेण्याचा प्रयत्न अनेक प्रकारे झाला़ सत्य शोधण्याचा प्रयत्न झाला़ पण त्याला मर्यादा आल्या़ आकाश हे काही कोणत्या प्रकारचे छत नाही की ज्याला तुम्ही जाऊन स्पर्श करू शकता. ती एक असीमित संभावना आहे. ते अमर्याद आहे. आध्यात्मिक प्रक्रिया या गोष्टी भिन्न नाहीत. अनंताचा शोध घेणे आणि आध्यात्मिक ओढ असणे हे एकमेकांपासून निराळे नाहीत. जर तुम्ही आकाशाकडे लक्षपूर्वक पाहिले तर या सृष्टीची रचना पाहून तुम्ही थक्क व्हाल आणि जेव्हा सृष्टी-रचना पाहून तुम्ही थक्क होता, तेव्हाच तुम्हाला सृष्टीकर्त्यामध्ये खरेखुरे स्वारस्य निर्माण होते. तोपर्यंत ते केवळ तुमच्या संस्कृतीशी निगडित विचारांचे मंथन असते जे निरर्थक आहे.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक