शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसचा 'हात' सोडला, आता 'धनुष्यबाण' उचलणार; निरुपमांच्या शिवसेना प्रवेशाचा मुहूर्त ठरला!
2
Kirit Somaiya: "याला मी आयुष्यात कधीच..."; यामिनी जाधव, रवींद्र वायकरांच्या उमेदवारीवरील प्रश्नावर किरीट सोमय्या गरजले!
3
Video - किरण सामंत यांचे स्वतंत्र वाटचालीचे संकेत?; उदय सामंत यांचे बॅनर, फोटो हटवले
4
शरद पवार यांच्या सुनबाई यावेळी दिल्लीला जाणार हे नक्की; चित्रा वाघ यांना विश्वास
5
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम
6
पाकिस्तानला करायचीय भारताची बोरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन
7
मुंबई लोकलमधून पडून आणखी एका तरुणाचा बळी; सात दिवसात तिघांचा मृत्यू
8
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
9
मराठमोळ्या अभिनेत्रीचा तुतारीला पाठिंबा, शरद पवारांसोबत स्टेजवर येत केला प्रचार
10
सिद्धू मुसेवाला हत्येचा मास्टरमाईंड गोल्डी ब्रारची अमेरिकेत हत्या: रिपोर्ट
11
सीएसएमटी स्थानकात आज पुन्हा लोकल रुळावरुन घसरली, हार्बर रेल्वे सेवा ठप्प!
12
बाळासाहेब रागावले तर माँसाहेब जवळ करायच्या, याउलट उद्धव ठाकरेंकडे...; शिंदेचे शिलेदार थेटच बोलले
13
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
14
पाकिस्तानात पीठ ८०० रूपये किलो; खाद्यपदार्थांचे दर गगनाला भिडले, का वाढली महागाई?
15
'दिलदार' बुमराहने चिमुरड्याला दिली 'पर्पल कॅप', छोट्या फॅनचा आनंद गगनात मावेना.., पाहा Video
16
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
17
"आम्हाला मत न दिल्यास वीज कापू"; काँग्रेस आमदाराची जनतेला धमकी, Video व्हायरल
18
ठाणे, कल्याणमध्ये राज ठाकरेंच्या सभा होणार; श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्केंनी घेतली भेट
19
Qualification scenario for MI & RCB : मुंबई इंडियन्सचं प्ले ऑफमध्ये जाण्याचं गणित सापडलं; RCB लाही त्यानं बळ मिळालं
20
“मोदींना सहन होत नाही, महाराष्ट्रात येऊन माझ्यावर, उद्धव ठाकरेंवर बोलतात”: शरद पवार

सर.. हा कधी सुधारणार? : मनाच्या विकारांकडे साक्षीभावाने पाहा! 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 01, 2018 8:53 PM

सर, मुलं लहान आहेत, मी खानदानी कुटुंबात वाढली आहे. त्यामुळे घटस्फोट पण घेता येत नाही म्हणून मला नैराश्य आलंय...

-डॉ.दत्ता कोहिनकर- पेपरमध्ये माझे अनेक लेख शिल्पाने वाचले होते. फोनवर झालेल्या संभाषणानुसार शिल्पा मला भेटायला आली होती. दिसावयास अत्यंत देखणी, सालस व निरागस असलेल्या शिल्पाचा चेहरा भलताच पडला होता.  चेहऱ्यावर व्याकुळता व खिन्नता जाणवत होती. माझ्या थोडयाफार झालेल्या कौन्सिलींगच्या अभ्यासानुसार मी तिला बोलते केले. शिल्पाच्या डोळयातून अश्रु गळू लागले. ती म्हणाली, सर.. माझा नवरा अभय याची आत्तापर्यंत चार प्रेमप्रकरणे मी पकडली. प्रत्येक वेळेस तो माफी मागून माझे अगदी पाय पकडतो व परत असे करणार नाही अशी मुलाबाळांची शपथ घेतो, परत वर्षभरातच ये रे माझ्या मागल्या चित्र असते. सर, मुलं लहान आहेत, मी खानदानी कुटुंबात वाढली आहे. त्यामुळे घटस्फोट पण घेता येत नाही म्हणून मला नैराश्य आलंय. सर मला सांगा अभयला मी काहीही कमी पडू देत नाही, तो ही माझ्यावर खूप जीवापाड प्रेम करतो. तरी तो असा का वागतो?सर सांगा हा कधी सुधारणार? त्यावेळेस मी शिल्पाला थोडं रिलॅक्स होण्यासाठी १० मी. श्वासावर लक्ष देऊन ध्यान करावयास लावले. नंतर तिला म्हणालो, निसर्गत:च पुरूषांच्या शरीरात टेस्टेस्टोरॉन नावाचे संप्रेरक त्याच्या कामभावना सतत उत्तेजित करत असते. हे संप्रेरक स्त्रियांच्या शरीरात खूप कमी प्रमाणात असते. स्त्रीला प्रेम, स्पर्श, आधार, आपलेपणा यात जास्त रस असतो. तर पुरूषांना प्रणयात जास्त रस असतो. पुरूषांच्या शरीरात टेस्टेस्टोरॉनची २४ तासात ४ ते ५ वेळा लाट स्त्रावते. ३७ % पुरूष दर तीस मिनिटांनी सेक्सचा विचार करतात. त्याला कारण शरीरात तयार होणारा टेरेस्टोरॉनचा स्त्राव. मेंदूमध्ये हायपोथॅलमस नावाचा जो भाग असतो. त्यात प्रणयाचं उगमस्थान असते. हा पुरूषांमध्ये बायकांपेक्षा जास्त मोठा असतो. त्यामुळे पुरूषांमध्ये प्रणयभावना प्रचंड असते. प्रत्येक पुरूषांचा विकारांचा साठा, झालेले संस्कार यावर बऱ्याचशा गोष्टी अवलंबून असतात. बाहेरख्यालीपणा हा गुण बऱ्याचशा पुरूषांमध्ये जन्मोजन्मी आलेला असतो. पूर्वी पुरूष युध्दाला गेले की, मोठया प्रमाणात मारले जायचे. त्यामुळे विधवांची संख्या जास्त असायची, म्हणून जमातीच्या अस्तित्वासाठी त्यावेळी पुरूषांनी जनानखाना बाळगण्याची प्रथा सुरू केली होती.त्यामुळे एक पुरूष अनेक स्त्रिया हा पूर्वसंस्कार पुढे आलेला असतो. पुरूषांची प्रणयभावना इतकी प्रबळ असते की ८% पुरूष हे प्रणयाच्या नशेवरच जगतात. बऱ्याच पुरूषांना निसर्गत: प्रणयात विविधता हवी असते. त्याच्या मेंदूतील ही खळबळ सारखी विविधता बाहेर शोधत असते. म्हणून बरेचसे पुरूष बाहेरख्याली असतात. यावर उपाय म्हणजे त्याच्या शरीरात निर्माण होणाऱ्या टेस्टेरेस्टोरॉन संप्रेरकाची लाट व प्रबळ कामभावनेचे वारंवार येणारे विचार याला साक्षीभावाने संवेदनांच्या आधारावर मन समतेत ठेवून जाणणे. यामुळे विकारांना वश करून त्यांचे मुळासकट निर्मुलन करता येते. सिध्दार्थ गौतम बुध्दांनी २५०० वर्षांपूर्वी यावर निसर्गाचा संपूर्ण अभ्यास करून मनाला सबल व निर्मलन करून मनाचे मालक बनण्याची साधना विपश्यना शोधून काढली. ज्यामुळे विकारांवर ताबा मिळवता येतो. शिल्पा विपश्यनेच्या या दहा दिवसांच्या शिबिराला अभयला बसव. शिल्पा लगेच तयार झाली व दोघेही दहा दिवसीय विपश्यनेच्या शिबिरात सामील झाले. शिबिरानंतर रोज सरावाने त्यांच्यातील भांडणे संपली, घरात शांती आली व आता मात्र मनातील विकारांकडे साक्षीभावाने पाहून मन वश करण्याची कला अभय शिकल्यामुळे त्यांचे एकपत्नीव्रत सहज व सोपे झाले.  आज दोघेही आनंदात संसार करत आहे. अशा अनेक स्त्रिया नवयाच्या बाबतीत सर हा कधी सुधारणार? असा प्रश्न करतात. माझे उत्तर मात्र एकच असते, विपश्यनेच्या शिबिरानंतर विशेष म्हणजे हे दहा दिवसीय निवासी शिबिर पूर्णत: विनामूल्य असते. यामुळे मन आपल्या ताब्यात ठेवून विकारांवर विजय मिळवणे सोपे होते. 

टॅग्स :PuneपुणेAdhyatmikआध्यात्मिकMeditationसाधना