शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Shravan Special : रामेश्वर, औंढा नागनाथ आणि घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाचं महत्त्व आणि महती!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2019 09:52 IST

आज श्रावणाचा चौथा आणि शेवटचा सोमवार. अनेक भाविकांनी शंकराची पूजा करण्यासाठी देशभरातील महादेव मंदिरांमध्ये गर्दी केली असेल. आज आपण शेवटच्या तीन ज्योतिर्लिंगाचं महत्त्व आणि त्यांची माहिती जाणून घेणार आहोत. 

Shravan Special : आज श्रावणाचा चौथा आणि शेवटचा सोमवार. अनेक भाविकांनी शंकराची पूजा करण्यासाठी देशभरातील महादेव मंदिरांमध्ये गर्दी केली असेल. आज आपण शेवटच्या तीन ज्योतिर्लिंगाचं महत्त्व आणि त्यांची माहिती जाणून घेणार आहोत. 

1. रामेश्वर

रामेश्वर दक्षिण भारतात प्रसिद्धच आहे. रामचंद्राने याची स्थापना केल्यामुळे या मंदिलाराला रामेश्वर असे नाव पडले. स्कंद पुराण व शिव पुराणांमध्ये या पवित्र क्षेत्राचा उल्लेख आलेला आहे. रामेश्वर द्वीपाचा आकार काहीसा श्रीविष्णूच्या शंखासारखा असून श्रीलंकेच्या राजाने याठिकाणी मंदिर बांधले होते. रामेश्वर मंदिराची निर्मिती १२ ते १६व्या शतकात झाली. इ.स. १८९७ मध्ये स्वामी विवेकानंद येथे दर्शनासाठी येऊन गेले आहेत.

रामोश्वर हे बंगालचा उपसागर व हिंदी महासागर यांचे संगम स्थान असून द्रविड स्थापत्य शैलीचे हे मंदिर मानले जाते. येथील मंडपाची निर्मिती इ.स. १७४० ते १७७० या कालावधीत झाली. या मंदिर परिसरात २२ विहिरी असून गर्भगृहात चांदीच्या चौथऱ्यावर सुंदर शिवलिंग आहे.

विशेष म्हणजे या शिविलगावर केवळ गंगाजलाचाच अभिषेक केला जातो. महाशिवरात्रीस मुख्य उत्सव होतो. हत्तीवरून रामेश्वराच्या पालखीची मिरवणूक काढण्यात येते. दीपोत्सव साजरा केला जातो. या ठिकाणी तामिळ भाविक मोठया प्रमाणावर यात्रेसाठी येत असतात. 

2. औंढा नागनाथ

औंढा नागनाथ पांडवांतील धर्मराजाने हे मंदिर बांधले असून महाराष्ट्रातील संत नामदेव  आणि त्यांचे गुरु विसोबा खेचर यांची प्रथम भेट याच मंदिरात झाली.  यांनतर  अहिल्याबाई होळकरांनी या मंदिराचा जीर्णोधार केला.                                            या मंदिरात २५ फुट उंचीची तटबंदी असून  चारही दिशांना चार दरवाजे आहेत. मंदिराचा खलाचा भाग काळ्या पाषाणात व वरील  अर्धा भाग पांढऱ्या विंटापासून तयार करण्यात आलेला असल्याने मंदिर खुलून दिसते. महाद्वारावर शिवलीलेचे प्रसंग आहेत. यात नटराज मूर्ती, शंकर पार्वतीस काही तरी समजावून सांगत असल्याचे विलाभोनीय दृश बघावयास मिळते. 

महाशिवरात्रीला येथे मोठा उत्सव होतो तसेच येथे होणारा रथौत्सव पाहण्यासाठी लांबून भाविक या ठिकामाला भेट देतात. रथाच्या ५ फेऱ्या मंदिराभावती मारल्या जातात. असं म्हटलं जातं कि, काशीची गंगा येथे प्रकट होते व कुंडाचे पाणी स्वच्छ करून टाकते. विजयादशमीच्या दिवशी नागनाथ महाराजांची पालखी निघते. 

3. घृष्णेश्वर

स्कन्दपुराण व शिवपूराण, रामायण व महाभारत यांसारख्या पवित्र ग्रथांमध्ये श्री घष्‍णेश्‍वराचा उल्‍लेख करण्यात आलेला आहे. सुमारे 1500 वर्षापासून राष्‍ट्रकुट घराण्‍यातील राजा कृष्‍णराजने हे मंदिर बांधले आहे. इ.स 1730 मध्‍ये गौतमीबाई महादेव होळकर यांनी मंदिराचा जिर्णोध्‍दार केला.

मंदिराचे मुळ नाव कुंकूमेश्‍वर होते. हे मंदिर शिल्‍पकलेचा उत्‍तम नमुना होय. मुळ दगडी चौथरा सहा हजार आठशे चार चौरस फुट असून अर्धे मंदिर हे लाल पाषाणाचे आहे. मंदिरात सुंदर नंदीची मूर्ती असून खांबावर रामायण व महाभारत, दशावतार आदींचे चत्र रेखाटलेली आहेत. इ.स 1791 मध्‍ये अहिल्‍याबाई होळकरांनी एक एकर बागेत शिवालय तिर्थ बांधले.

महाशिवरात्रीची मोठा यात्रोत्‍सव भरविला जातो.शंकराची पालखी शिवालय तिर्थावर स्‍नानासाठी आणली जाते. रात्रीच्‍यावेळी अंलकार पूजेचा सोहळा होतो. श्रावण सोमवारी मोठया प्रमाणावर भाविक दर्शनासाठी येथे येतात.

टॅग्स :Jyotirlingaज्योतिर्लिंगShravan Specialश्रावण स्पेशलTravel Tipsट्रॅव्हल टिप्सAdhyatmikआध्यात्मिक