शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

Shravan Special : ओंकारेश्वर, केदारनाथ आणि भीमाशंकर ज्योतिर्लिंगांची महती!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2019 10:45 IST

श्रावणातील आज दुसरा सोमवार. नेहमीप्रमाणे आजही भगवान महादेवाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी बघायला मिळत आहे. आज आपण पुढच्या तीन ज्योतिर्लिंगांची माहिती आणि त्यांचं महत्त्व जाणून घेऊया.

पवित्र श्रावण महिन्याला सुरुवात झाली असून आज दुसरा श्रावणी सोमवार आहे. भाविकांनी महादेवाच्या दर्शनासाठी वेगवेगळ्या मंदिरांमध्ये गर्दी केली आहे. या दिवसात देशातील 12 ज्योतिर्लिंग असलेल्या ठिकाणीही भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते. श्रावणी सोमवारनिमित्त आपण तीन ज्योतिर्लिंगांचं महत्व जाणून घेऊया... श्रावणातील आज दुसरा सोमवार. नेहमीप्रमाणे आजही भगवान महादेवाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी बघायला मिळत आहे. आज आपण पुढच्या तीन ज्योतिर्लिंगांची माहिती आणि त्यांचं महत्त्व जाणून घेऊया. गेल्या आठवड्यात पहिल्या तीन ज्योतिर्लिंगांची माहिती आपण पाहिली होती. 

1.  ओंकारेश्वर

ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग मध्यप्रदेशमधील प्रसिद्ध शहर इंदोरजवळ आहे. ज्या स्थानावर हे ज्योतिर्लिंग आहे, तेथून नर्मदा नदी वाहते आणि पर्वताच्या चारही बाजूस नदी वाहत असल्याने इथे ऊं असा आकार तयार झाला आहे. याने ज्योतिर्लिंगाने ओंकार म्हणजेच ऊं चा आकार घेतला आहे. त्यामुळेच या ज्योतिर्लिंगाला ओंकारेश्वर या नावानेही ओळखले जाते. नर्मदा भारतातली पवित्र समजली जाणारी नदी आहे. ॐकारेश्वर येथे एकूण ६८ तीर्थ आहेत. याशिवाय २ ज्योतिस्वरूप लिंगांसहित १०८ प्रभावशाली शिवलिंगे आहेत. मध्यप्रदेशात प्रसिद्ध १२ ज्योतिर्लिंगांपैकी २ ज्योतिर्लिंगे आहेत. एक महाकाल नावाचे उज्जैन मध्ये, व दुसरे अमलेश्वर नावाचे ओंकारेश्वर येथे आहे.

2.  केदारनाथ

केदारनाथ येथील ज्योतिर्लिंग भगवान महादेवाच्या 12 ज्योतिर्लिंगापैकी महत्वाचे आहे. हे उत्तराखंड राज्यात आहे. बाबा केदारनाथचे मंदीर बद्रीनाथ मार्गावर आहे. हे मंदिर भारत देशाच्या उत्तराखंड राज्यातील केदारनाथ गावात मंदाकिनी नदीच्या काठावर बांधले गेले आहे. केदारनाथ समुद्र तळापासून 3584 मीटर उंचावर आहे. हे ज्योतिर्लिंग भगवान शिवाला अत्यंत प्रिय आहे असे म्हणतात. केदारनाथ मंदिराची निर्मिती पांडवांनी केली तर आद्य शंकराचार्यांनी ह्या मंदिराचे पुनरुज्जीवन केले असे मानण्यात येते. केदारनाथ सर्व ज्योतिर्लिंगांपैकी सर्वाधिक उंचीवर स्थित असून येथे भेट देण्यासाठी केवळ पायवाट अस्तित्वात आहे. गौरीकुंडहून 14 किलोमीटर लांबीचा खडतर प्रवास करूनच केदारनाथ मंदिराचे दर्शन घेता येते.

3.  भीमाशंकर

भीमाशंकर हे ज्योतिर्लिंग महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात सह्याद्री पर्वतावर आहे. भीमाशंकर ज्योतिर्लिंगाला मोटेश्वर महादेव या नावानेही ओळखले जाते. भीमानदीचे मूळ उगम ज्योतिर्लिंगात आहे, परंतु ती तिथून गुप्त होते आणि मंदिरापासून जंगलात साधारणपणे 1.5 किमी पूर्वेला पुन्हा प्रकटते असे मानले जाते. ही जागा गुप्त भीमाशंकर म्हणून ओळखली जाते.

टॅग्स :Shravan Specialश्रावण स्पेशलJyotirlingaज्योतिर्लिंगTravel Tipsट्रॅव्हल टिप्सtourismपर्यटनKedarnathकेदारनाथBhimashankarभीमाशंकर