शहरं
Join us  
Trending Stories
1
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
2
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
3
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
4
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
5
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
7
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
8
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
9
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
10
Shark Tank India नं 'या' Startup ला पाठवली कायदेशीर नोटीस, वाचा नक्की कशावरुन झाला वाद?
11
एसटी बसेस निवडणूक कामात व्यस्त, प्रवासी मात्र त्रस्त
12
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
13
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
14
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
15
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
16
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
17
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
18
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
19
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
20
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज

योग्य मार्गदर्शक लाभला की प्राप्त होते देवपण 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2019 2:42 PM

खरंच देव होता येते का? देवपण इतके सोपे आहे का?

- हभप भरतबुवा रामदासी (बीड ) 

देवपणाच्या प्रगटी करणासाठी माणसात संस्कार हवे. आज देवपण तर लांबच राहिले. माणसातले माणूसपण तरी कुठे शिल्लक राहिले आहे? माणसाने देव व्हावे ही या जगातल्या प्रेषितांची इच्छा होती. त्यासाठी त्यांनी संस्काराचे महत्त्व सांगितले. मंडळी. ...! खरंच देव होता येते का? देवपण इतके सोपे आहे का? तुकाराम महाराज साधना सांगतात- देव पहावो देव पहावो!  उंच जागी ऊभे राहावो ! उंच जागा ही साधना आहे. ही उंच जागा पद, प्रतिष्ठा, सत्ता, संपत्ती, कुल, वर्ण यांच्या सीमा पार असणारी आहे. देवपणा प्राप्त करण्यासाठी कितीतरी टाकीचे घाव सहन करावे लागतात. हे घाव सहन करण्याची क्षमता ज्या व्यक्तीमत्वात असते ते देवपदापर्यंत जाऊ शकतात. मंडळी, ...दगडाला जर देव होता येते तर, माणसाला होता येणार नाही काहो? दगडातल्या देवपणाच्या प्रगटी करणासाठी जाणकार शिल्पकार मिळायला हवा. माणसाचही तसंच आहे. योग्य मार्गदर्शक लाभला की देवपण प्राप्त होते. आचार्य अत्रे यांची एक कविता मला आठवते. कविता भावपूर्ण आहे. कवितेचे नाव फत्तर आणि फुले  ...!

डोंगराच्या एका पायथ्याशी एक मोठा प्रचंड दगड पडलेला होता. अनेक वर्षांपासून त्याच जागेवर तो पडून होता. जवळच एक जाईच्या फुलाची वेल बहरलेली होती. त्या बहरून आलेल्या फुलांनी एकदा त्या दगडाची थट्टा केली. अरे....! तू तर दगड. ..तुझा या जगाला उपयोग तरी काय...? तुझ्या जीवनात कुठलेही परिवर्तन नाही. क्र ांती नाही. काय उपयोग तुझा. .?‘थट्टेखोर फुले हसून वदली धोंड्यास ती एकदा! धोंडा केवळ तू अरे न जगती काही तुझा फायदा!!दगडाला फुलाचे टोचून बोलणे सहन झाले नाही. तो दगड फुलांना म्हणाला,   तुमचे बाह्य सौंदर्य तरी किती काळ टिकणार  आहे. .? तुम्ही पण एक दिवस कोमेजून जाल. ..! मग नुसतेच निर्माल्य. ....त्या वेळी तुम्हाला विचारतो तरी कोण. ..? दगडाचे हे उत्तर ऐकून, फुले मात्र पांढरी पडली. ...एक दिवस एक सुजाण शिल्पकार रस्त्याने जाताना त्या डोंगरावर आला. त्याने तो दगड बघितला. आणि त्या दगडात त्याला एक दिव्यता दिसली. त्याने अथक परिश्रमातून छन्नी हातोड्याच्या सहाय्याने त्या दगडाची एक सुबक सुंदर जगदंबेची मूर्ती घडवली. त्याच ठिकाणी ती ठेवली. एक दिवस देवीचा एक भक्त त्या रस्त्यावरून जाताना त्याने ती बघितली. तो मूर्तीजवळ गेला. शेजारीच असलेल्या जाईच्या फुलांनी मूर्तीची पुजा केली. देवाचिये द्वारी क्षणभर बसला. विनम्रपणे हात जोडले व आल्या रस्त्याने निघून गेला. तात्पर्य काय. ..तर, जाणकार शिल्पकार मिळण्याची गरज आहे. देव तर आपल्यातच आहे. दगडावर संस्कार केले. आणि देवत्व प्रगटले. असे सुयोग्य संस्कार घडले तर, मानवत्वाकडून आपल्यालाही देवत्वाकडे जाता येईल.

(लेखक हे राष्ट्रीय कीर्तनकार आहेत.त्यांच्या संपर्क क्र.8329878467 )

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकspiritualअध्यात्मिक