चिंता सोडा...सुखी रहा...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2020 12:49 IST2020-03-21T12:49:16+5:302020-03-21T12:49:37+5:30

मी जीवनात पुढे जाऊ शकतो, आणि मी जाणार...!

Release worry ... be happy ...! | चिंता सोडा...सुखी रहा...!

चिंता सोडा...सुखी रहा...!

जीवनात अनेकदा जे वाईट झाल त्याचा स्वीकार करून पुढे जाव लागत. हे झाल आहे, आणि ते बदलू शकत नाही. परंतु मी जीवनात पुढे जाऊ शकतो, आणि मी जाणार.  या सकारात्मक विचारांनीच जीवनात सर्व समस्यांना सामोरे गेलं पाहीजे. आयुष्यात अनेक जण अनेक लोक अपयशी झालेत. मात्र, त्यांनी जगण्याची जिद्द सोडली नाही. तसंच चिंता सोडल्यास मनुष्य सुखी होवू शकतो.  

पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांमध्ये चिंतेचे प्रमाण जास्त आहे. बºयाच स्त्रिया आपले संपूर्ण  आयुष्य विविध प्रकारच्या चिंतेच्या छायेखाली जगतात. काही स्त्रियांमध्ये या सामान्य वाटणाºया चिंतेचे विविध आजारामध्ये रूपांतर होते. चिंता  ही शरीराला हळुहळु खातं जाते. त्यामुळे सकारात्मक उजेर्ने चिंतेला सामोरे जाणं गरजेचे आहे.

जीवनात कितीही वाई घडले; वाईट झाले तरी,  संयम आणि वेळेच्या औषधाने एकदिवस सर्वकाही बरे होते. कालांतराने सर्व संकटे ही पुरस्कारच घेवून येतात. असा आत्मानुभव प्रत्येकाला येतो. चिंता ही चितेसमान असल्याने कुणीही निराश होता कामा नये. भगवंत आणि ही सृष्टी कुणाचेही वाईट करीत नाही. चिंतेच्या आजारात एखादी न सोसणारी त्रासदायक घटना या लक्षणांची सुरुवात करते. मग ही लक्षणे सोसणेसुद्धा रुग्णास असह्य होते. सांगता येत नाही व सोसतही नाही असे अवघड दुखणे म्हणजे चिंतेचा आजार. म्हणूनच चिंतेबाबत स्वत:शी तर्क करत बसण्यापेक्षा तणाव वा चिंता कमी करणं हाच सर्वात उत्तम उपाय आहे. 
- ह.भ.प. सुखदेव धारेराव महाराज

Web Title: Release worry ... be happy ...!