शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

रमजान पुष्प : कुरआन पठणाचा महिना

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2020 19:05 IST

रमजानच्या पवित्र महिन्यात जास्तीत जास्त या ग्रंथाचे पठण करावे, त्याला समजून घ्यावे.

जाजेबा कौसर चिश्ती- रमजान आणि कुरआन, या दोन गोष्टी एकमेकांना पूरक आहेत. पैगंबर साहेबांवर रमजानच्या महिन्यात पूर्णपणे अवतरण झाले. याला तेवीस वर्षे लागली. पैगंबर साहेब एरवीपेक्षा या महिन्यात कुरआनपठणाचे जास्त इतमाम करायचे. त्यांना संपूर्ण कुरआन मुखोद्गत असले तरी ईशदूत हजरत जिब्रील (अ.स.) रमजानच्या महिन्यात त्यांच्याकडून कुरआन ऐकून घ्यायचे. त्यांच्या पवित्र जीवनातील रमजानच्या अंतिम महिन्यात जिब्रील अ.स. यांनी प्रेषित साहेबांकडून दोनदा कुरआन ऐकून घेतले आणि ते बरोबर असल्याची खात्री करून घेतली. आज आपण जे कुरआन वाचतो, अक्षरश: त्याचीच छापील प्रत आहे. कुरआन जगातील एकमेव असा ग्रंथ आहे, ज्यात १,४०० वर्षांपासून एका अक्षराचासुद्धा बदल घडून आलेला नाही आणि प्रलयापर्यंत याची शक्यताही नाही, कारण छापील आवृत्त्या, छापखाने, संगणक, मोबाईल फोन, इंटरनेट आणि त्यासारखी लोखंडी साहित्ये संपुष्टात आली तरी जगात अशी कोट्यवधी माणसे आहेत, ज्यांना पवित्र कुरआन संपूर्णपणे मुखोद्गत आहे. जगाच्या कुठल्याही भूप्रदेशात जा, त्यांच्या पठणातून काडीमात्रही फरक आढळून येणार नाही. पवित्र कुरआनच्या सुरक्षिततेची ही आस्मानी व्यवस्था आपण आपल्या डोळ्यांनी निरीक्षण करू शकता. पवित्र कुरआनच्या या अद्भुत संरक्षणव्यवस्थेसंदर्भात अल्लाह स्वत: वचनबद्ध आहे. ‘‘इन्ना नहनु नज़्ज़लनज़ ज़िक्र व इन्ना लहू लहाफिज़ून.’’ (हे स्मरण आम्ही अवतरले आहे आणि आम्ही स्वत: याचे संरक्षक आहोत. - अल्हिज्र : १५:९)एक असा ग्रंथ जो जगात एकमेव आहे, अप्रतिम आहे, आकाशी आहे, जो प्रलयापर्यंत मानवाच्या मार्गदर्शनाची शपथ घेतो, खरे पाहिले तर माणसांनी जीवापलीकडे जाऊन त्याची कदर केली पाहिजे. आपण कुरआनला त्यागले तर तो आपला त्याग करेल आणि अशी माणसे त्याच्या संरक्षणाकरिता पुढे सरसावतील ज्यांचा जगाच्या इतिहासात कुठे उल्लेखही नसेल. रमजानच्या पवित्र महिन्यात जास्तीत जास्त या ग्रंथाचे पठण करावे, त्याला समजून घ्यावे. आपल्या मुलाबाळांना ते समजून सांगावे, जेणेकरून आपल्याला कुरआन पठणाची सवय लागेल आणि आपले जीवन सफल करता येईल.              (क्रमश:)

टॅग्स :PuneपुणेRamzanरमजानMuslimमुस्लीमAdhyatmikआध्यात्मिक