शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांनी जानेवारीत केली होती लाल किल्ला भागात रेकी, टॉवर लोकेशन डेटाद्वारे करण्यात आली खात्री
2
तेजस्वीची राजद घेईल सर्वाधिक जागा, पण सत्ता एनडीएचीच, 'ॲक्सिस माय इंडिया' एक्झिट पोलमध्ये अंदाज  
3
काश्मीरमध्ये तीन दिवसांत तब्बल १५०० जण ताब्यात, कुलगाम-सोपोरसह शेकडो ठिकाणी छापे, झडती तीव्र
4
एमसीएच्या निवडणुकीमध्ये आ. जितेंद्र आव्हाड यांची बाजी, उपाध्यक्षपदी १३६ मतांनी विजय; अध्यक्षपदी अजिंक्य नाईक यांची बिनविरोध निवड
5
‘ओंकार’ जाणार वनतारामध्ये, सर्किट बेंचचा निर्णय, मूळ याचिका कायम
6
तुर्कीयेचे लष्करी मालवाहतूक विमान कोसळले; २० ठार
7
रोहित शर्मा ७ वर्षांनंतर खेळणार विजय हजारे करंडक, विराटबाबत संभ्रम
8
जुरेल घेणार रेड्डीचे स्थान, पहिल्या कसोटीत ऋषभ पंतही खेळणार, अक्षर पटेलला अंतिम संघात संधी
9
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
10
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
11
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
12
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
13
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
14
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
15
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
16
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
17
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
18
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
19
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
20
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?

शब्दी सामर्थ्य आती

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2019 04:59 IST

श्रीचक्रधरांनी मराठीला काय दिलं याचं उत्तर अर्थपूर्ण शब्द दिले. शब्दांत सामर्थ्य असतं हे भोळ्याभाळ्या लोकांना प्रथमच मराठीत सांगितलं.

- बा.भो. शास्त्रीश्रीचक्रधरांनी मराठीला काय दिलं याचं उत्तर अर्थपूर्ण शब्द दिले. शब्दांत सामर्थ्य असतं हे भोळ्याभाळ्या लोकांना प्रथमच मराठीत सांगितलं. पक्वान्नात सहाच रस. शब्दांत शांत रसासह दहा रस आहेत. ईश्वराच्या शब्दांत ब्रह्मरस असतो. त्याच्या शब्दांना शब्दब्रह्म म्हणतात. डाळिंबाच्या दाण्यासारखे ते परास्पर्शित असतात. शब्दरसवत्तेने ओथंबलेले शब्द देवपूजेला चालतात. ते फुलांसारखे व वज्राहून कठोर असतात. शब्दांना गंध-सुगंध आहे. त्यात आग आहे. प्रेम आहे. शब्द हे पदार्थासारखे कडू, आंबट, खारट, तिखट असतात. ते रुक्ष असतात. दक्ष असतात. शृंगार, हास्य, करुण, रौद्र, वीर, भयानक, बीभत्स व अद्भुत रसांचे पाट काव्यातून वाहत असतात. तर हे काव्यही समर्थ शब्दांच्या मदतीनेच तयार झालेलं असतं.स्वामी गद्यातून बोलले व संत ज्ञानेश्वर महाराज पद्यातून बोलले. हे त्यांचं मराठीतल्या सामर्थ्यावर प्रेम आहे. ‘भाषा कशी असावी याचं उत्तर ज्ञानेश्वरसारखी असावी असं आहे. तर भाषा कशी होती याचं उत्तर लीळाचरित्रासारखी होती’ एका साहित्यिकाचं हे वाक्य बरोबर आहे. स्वामींच्याच मुखातलं आणि शोधनीच्या पाठातलं, ‘शब्दी सामर्थ्य आती’ हे आजचं सूत्र आहे. शब्दसृष्टी ही मानव सृष्टीसारखीच असते. शब्दांचेही स्वभाव भिन्न असतात. शब्द चांगले व वाईट पण आहेत. एका ब्राह्मणाला पाच विधवा मुली असतात.  गाव त्याला त्रास देतं. ‘या पंचरांडा, जा पंचरांडा’ या शब्दांनी संबोधतं. चांगल्या मुलींवर आळच घेतं. तो दु:खाने जळत असतो. तो स्वामींच्या भेटीला गेला. स्वामी म्हणाले, ‘या पंचगंगा हो’ तो प्रसन्न झाला व म्हणाला, ‘निवालाजी निवाला.’ स्वामी म्हणाले, तुमच्या मुली गंगेसारख्या पवित्र आहेत. गंगा शब्दाने जळत्या ब्राह्मणाचं दु:ख विझलं. त्याने वापरलेला ‘निवालाजी’ हा शब्द किती अर्थपूर्ण आहे. आधी शब्दांनी जळाला व आता शब्दांच्या थंडाव्याने निवाला. म्हणूनच शब्द जपून वापरायचे असतात.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक