शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
3
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
4
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
5
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
6
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
7
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
8
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
9
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
10
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
11
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
12
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
13
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
14
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
15
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
16
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
17
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
18
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...
19
"आई...मी त्याला मारून टाकलं, खोलीत बॉडी पडलीय"; मोठ्या बहिणीनं छोट्या भावाला का मारले?
20
ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेची रोमँटिक केमिस्ट्री, 'आरपार' सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज

कुछ तो लोग कहेंगे..!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2019 21:08 IST

आपण शीलपालन-नैतिकता जपत आपली सर्व कर्तव्ये-मनुष्यधर्म व्यवस्थित पार पाडत आहोत ना, हे अंर्तमनाने जाणा व समाज काय म्हणेल, म्हणून स्वत:ला मानसिक त्रास करून घेऊ नका. वर्तमानात सत्कर्म करून भविष्य उज्ज्वल करणे हे मात्र आपल्या हातात असते.

डॉ. दत्ता कोहिनकरअशोक व मुक्ता कर्तव्यदक्ष, प्रेमळ, नीतिमान दाम्पत्य. मुक्ता अशोकला विनवणी करून ध्यान केंद्रात घेऊन आली होती. त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर अशोकला आलेले नैराश्य व त्याची कारणे लक्षात आली. अशोक सरकारी अधिकारी, कामात अत्यंत चोख व नीतिमान असल्याने महाराष्ट्र शासनातर्फे त्याचा गौरव झाला होता. घर, पैसा, आरोग्य, सुबत्ता, सामाजिक प्रतिष्ठा सर्व काही सुरळीत चालले होते. मुलामुलींना चांगल्या शाळेत टाकून उत्तम संस्कार केले जात होते. पण, दहावीनंतर मुलाने अचानक गाड्या चोरणे, मारामाऱ्या करणे, अमली पदार्थांचे सेवन करणे चालू केले. बऱ्याचदा चोरीच्या प्रकरणात वर्तमानपत्रात त्याच्या ठळक बातम्या, चौकीवरचे बोलावणे, कोर्टकचेरी यांमुळे अशोक खूपच खचला होता. समाजात सगळीकडे अवहेलना व नातेवाईक काय म्हणत असतील? या विचाराने त्याला नैराश्य आले. त्यातच एकुलत्या एका मुलीच्या प्रेमप्रकरणाची वार्ता त्याच्या कानी आली. समाजात कसं तोंड दाखवू? लोक काय म्हणतील? या नकारात्मक भावनांशी पुन:पुन्हा समरस होत तो नकारात्मक तरंगांशी कनेक्ट होऊन उदासी, बेचैनी व नैराश्यात जायचा. खरोखर मित्रांनो, म्हणतात ना ‘सबसे बडा रोग - क्या कहेंगे लोग।’ माणूस समाजाला खूपच भीत असतो. अशोकशी झालेल्या चर्चेनंतर त्याने मुलगा व मुलगी यांच्याप्रति वडील या नात्याने असलेली कर्तव्ये पूर्णत: व्यवस्थित पार पाडली होती. त्यात तसूभरही कमी केले नव्हते. चांगल्या संस्कारांची पेरणी त्या दोहोंनी मुलांवर भरपूर केली होती; पण बी दगडावर पडल्याने त्याला अंकुर फुटत नव्हता. काही वेळा आपण सर्व काही प्रयत्न करूनही अपेक्षित गोष्टी घडत नाहीत व सहजपणे अनपेक्षित गोष्टी घडतात. येथे कर्मफल सिद्धांताचे समीकरण जुळते. 

अशोकच्या कर्मफल सिद्धांतानुसार पालक म्हणून सर्व कर्तव्ये पूर्ण करीत असतानादेखील अशा प्रकारे मुलाने वर्तणूक करून बदनामी केली, या कृतीला आपल्याच कर्माचे फळ म्हणून सहजपणे स्वीकारण्याचे व स्वत:ची हानी न करून घेण्याचे मर्म चर्चेतून अशोकला उमगले आणि मनाची सबलता व निर्मलता वाढविण्यासाठी तो शिबिरास बसायला तयार झाला. प्रारब्धानुसार स्त्री-पुत्र-नातलग एकच येतात. सुख-दु:खे देतात, ॠणानुबंध संपले की विभक्त होतात. काही वर्षांपूर्वी कोकणात अतिवृष्टी झाली, तेव्हा करोडपती सरकारी भोजनाच्या रांगेत उभे होते. संजय गांधी, प्रमोद महाजन यांचा किती अचानक अंत झाला. या जगात सर्व काही आपल्या कर्मानेच घडते. अंबाने श्रीखंडीचा जन्म घेतला तो भीष्मांना मारण्यासाठीच. आई-वडिलांमुळे रामाला वनवासात जावे लागले. अशा अनेक विषयांवर प्रकाश टाकला, की लक्षात येते, आपण आपली कर्तव्ये मनापासून- नीतीने पार पाडायची. बाकी सर्व कर्माच्या गतीवर अवलंबून असते. त्यामुळे हे माझ्याच गतकर्माचे फळ-त्याचा विपाक आनंदाने स्वीकारून मनाची समता ठेवायची व दुष्कर्म व स्वत:ची हानी टाळायची. लोक काय म्हणतील, यावर जास्त विचारमंथन न करता आनंदी राहायचे. गौतम बुद्ध म्हणाले, ‘ज्याची निंदा व अवहेलना होत नाही असा कोणीही सापडणे शक्य नाही.’ म्हणून निंदेला- अवहेलनेला घाबरू नका, आपण शीलपालन-नैतिकता जपत आपली सर्व कर्तव्ये-मनुष्यधर्म व्यवस्थित पार पाडत आहोत ना, हे अंर्तमनाने जाणा व समाज काय म्हणेल, म्हणून स्वत:ला मानसिक त्रास करून घेऊ नका. वर्तमानात सत्कर्म करून भविष्य उज्ज्वल करणे हे मात्र आपल्या हातात असते. भविष्य उज्ज्वल करण्यासाठी वर्तमानकाळात शील-समाधी-प्रज्ञा (यम-नियम)चा अभ्यास करा. शेवटी निंदा करणे हा एक मनुष्यस्वभावच असतो.

‘कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना, छोडो बेकार कि बाते- कही बीत न जाये रैना।’                

   (लेखक प्रसिद्ध व्याख्याते आहेत.)

टॅग्स :PuneपुणेAdhyatmikआध्यात्मिकrelationshipरिलेशनशिप