शहरं
Join us  
Trending Stories
1
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
2
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
3
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
4
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
5
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
6
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
7
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
8
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
9
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
10
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
11
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
12
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
13
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
14
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
15
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
16
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
17
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
18
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
19
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
20
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा

उपनिषदातील शांतिमंत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2019 4:43 AM

उपनिषद म्हणजे काय, तर उप+निष म्हणजे जवळ जाणे ..सत्याच्या जवळ जाणे, उपनिषद म्हणजे जवळ बसणे.

- शैलजा शेवडेउपनिषद म्हणजे काय, तर उप+निष म्हणजे जवळ जाणे ..सत्याच्या जवळ जाणे, उपनिषद म्हणजे जवळ बसणे. अत्यंत भक्तिभावाने गुरूच्या जवळ बसून शिष्य जी परामार्थ विद्या संपादन करतो, त्या विद्येला ‘उपनिषद’ असे म्हणतात. स्वामी विवेकानंद म्हणतात, ‘शक्तीची उपासना हाच सांगावा मला उपनिषदांच्या पानोपानी दिसतो. आपण शक्तीची उपासना केला पाहिजे. उपनिषदे म्हणजे सामथ्यार्चा अक्षयकोषच आहेत. सर्व विश्व गदगदा हलवील, असे सामर्थ्य उपनिषदांमध्ये भरलेले आहे. सारे विश्व त्यांच्या संदेशाने चैतन्यमय होईल, सामर्थ्यमय होईल.’इतरा नावाची तपस्विनी होती. तिचा पुत्र ऐतरेय. त्याने रचलेले उपनिषद ते ऐतरेय उपनिषद! हे उपनिषद ऋग्वेदावर आधारलेले आहे. ऋग्वेद हा सर्वात प्राचीन ग्रंथ. ऋषींनी जे पाहिले, अनुभवले, त्यावर त्यांनी विचार केला. त्याचा अनुभव घेऊन जीवनावर होणारा त्याचा परिणाम पाहिला. त्या वेळी त्यांच्या मुखातून बाहेर पडलेले मंत्र... मंत्र लिहिले जात नाहीत, ते रचले जातात. ते रचणाऱ्या ऋषींना मंत्रद्रष्टेच म्हणतात.उपनिषदात शांतिमंत्र असतात. शांतिमंत्र म्हणजे शांतीची इच्छा करणारे मंत्र असतात. शांतिमंत्राचा उद्देश हा पठण करणाºयाचे मन आणि तेथील वातावरण शांत करणे हा असतो. असे मानले जाते की, शांतिमंत्र सुरुवातीला म्हणल्यावर कार्यात बाधा येत नाही. हा मंत्र समाप्त करताना तीनदा ‘शांति शांति शांति’ असे म्हणतात.१) आधिभौतिक २)आधिदैविक ३) आध्यात्मिकवेगवेगळ्या उपनिषदात वेगवेगळे शांतिमंत्र आहेत. इथे आपण ऐतरेय उपनिषदातील शांतिमंत्र घेणार आहोत.ऐतरेय उपनिषद शांतिमंत्रॐ वाङ् मे मनसि प्रतिष्ठिता। मनो मे वाचि प्रतिष्ठितम।आविराविर्म एधि। वेदस्य म आणीस्थ:।श्रुतं मे मा प्रहासी: अनेनाधीतेनाहोरात्रान्सन्दधामि ।ऋतं वदिष्यामि। सत्यं वदिष्यामि। तन्मामवतु। तद्वक्तारमवतु। अवतु माम। अवतु वक्तारामवतु वक्तारम॥ ॐ शान्ति: शान्ति: शान्ति: ॥याचा अर्थ मी काव्यातून मांडला आहे.ॐ माझी वाणी मनामध्ये, राहो दृढ, नि सुस्थिर,सत्य शिवाचे विचार, मनी येवो निरंतरवाणीमध्ये येवो नित्य, प्रतिबिंब ते मनीचे,राहो सुस्थिर, सुंदर, शब्द शब्द अंतरीचे.देई दर्शन ईश्वरा, देई वेदांचे ते ज्ञानअहोरात्र अध्ययन, त्याचे न हो विस्मरण,ध्यास घेईन ज्ञानाचा, मनोवाचेने वेदांचा,नित्य सत्य मी बोलेन, नित्य सत्य आचरेनकर रक्षण स्वसंवेद्या, कर रक्षण तू माझे,कर रक्षण वक्त्याचे, कर रक्षण श्रोत्याचे.ॐ शान्ति: शांति: शांति:..खरोखर अतिशय सुंदर विचार आहेत या शांतिमंत्रात...!प्रज्ञान आत्म्याला समजावून घेऊन आपल्या प्रत्येक कृतीतून, चालण्या - बोलण्यातून वागण्यातून आम्ही जगू. ही आत्म्याची शक्ती , स्वरूप वाणीमध्ये सतत जागृत राहू दे. वेदांनी सांगितलेले उत्तम ज्ञान चराचराकडून ग्रहण करावे. त्याचा अनुभव घ्यावा. मी संकल्प नव्हे, प्रतिज्ञा करीन, ‘सत्य बोलेन, ऋत बोलेन. जे सत्य, पवित्र आणि सनातन असेल, जे कधीही बदलणार नाही, तेच मी माझ्या शब्दातून व्यक्त करीन.’