शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्या' ५ जागांबाबत राजनाथ सिंह आणि शरद पवारांमध्ये फोनवरून चर्चा; प्रकाश आंबेडकरांचा दावा
2
पवार वि. पवार वादाला मतदार कंटाळला; बारामतीत टक्का घसरला
3
आजचे राशीभविष्य - ८ मे २०२४; धन - मान - सन्मान मिळतील, सरकार कडून फायदा होईल
4
ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप सरकार कोसळणार? हरयाणामध्ये तीन अपक्ष आमदारांनी काढला पाठिंबा
5
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार
6
‘सेक्स स्कँडल’च्या २५,००० पेन ड्राइव्हचे पोलिसांनीच वाटप केले; कुमारस्वामी यांचा आरोप, मोदीही प्रथमच बोलले
7
अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्ट अनुकूल; पण...
8
'तुला सहानंतर कोण आहे? बारामतीचा कोण येत नाही'; आमदार दत्ता भरणेंची शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ
9
मतदानाच्या दिवशी बारामतीत नात्यांचा ट्विस्ट, सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या आईची भेट; तर अजित पवार म्हणाले... मेरी माँ मेरे साथ है!
10
‘मुस्लीम आरक्षण’ नवा मुद्दा; प्रचारात होतोय वारंवार उल्लेख, मोदींच्या जाळ्यात विरोधक अडकले
11
१० लाख इनाम असलेल्या बासित दारसह ४ अतिरेकी चकमकीत ठार
12
४ जून ‘इंडिया आघाडी’ची एक्स्पायरी डेट : पंतप्रधान मोदी 
13
घराण्याचा वारसा जिंकणार की नव्या चेहऱ्याला कौल मिळणार? विखे-लंके लढत : महसूलमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
14
‘बंगाली प्राइड’वर अन् विकास-अराजकतेमध्ये संघर्ष; दक्षिण बंगालच्या जागांवर तृणमूलची मदार
15
डाॅक्टरांच्या मनाईनंतरही धोनी खेळतोय आयपीएल; याच्या मांसपेशी फाटल्या
16
दिल्लीच्या प्ले ऑफच्या आशा कायम; राजस्थानचा २० धावांनी पराभव; संजू सॅमसनची अपयशी झुंज
17
बीअर शॉपीच्या परवान्यासाठी लाच; उत्पादन शुल्क अधीक्षकासह तीन अधिकारी जाळ्यात
18
‘मॅट’ने केले राज्य सरकारचे पोस्टमार्टेम; वैद्यकीय शिक्षण संचालकांची नियुक्ती तत्काळ संपुष्टात आणण्याचे आदेश; नवीन संचालक नेमा
19
उपनगरांतील मतदार दिलदार, शहरात कंजुषी; मुंबईतील सर्व मतदारसंघांचे आकडे काय सांगतात...
20
दौडा दौडा... भागा भागा सा... प्रचार करताना दमछाक

याला जीवन एैसे नाव ;  जूळवून घ्या ना राव    

By ऑनलाइन लोकमत | Published: June 08, 2019 8:45 PM

हेकेखोर स्वभाव व जुळवून घेणे जमत नसल्याने केदार कुठल्याही नोकरीत स्थिर होत नव्हता. सासर्‍यांच्या ओळखीने त्याला नामांकित कारखान्यात नोकरी लागली होती. ती पण त्याला टिकवता आली नाही. या गोष्टींचा त्याच्या मनावर परिणाम होऊन तो नैराश्यात गेला.

 - डॉ. दत्ता कोहिनकर    हेकेखोर स्वभाव व जुळवून घेणे जमत नसल्याने केदार कुठल्याही नोकरीत स्थिर होत नव्हता. सासर्‍यांच्या ओळखीने त्याला नामांकित कारखान्यात नोकरी लागली होती. ती पण त्याला टिकवता आली नाही. या गोष्टींचा त्याच्या मनावर परिणाम होऊन तो नैराश्यात गेला. तीव्रता इतकी वाढली कि तो आक्रमक ( Aggressive ) होऊन घरात वस्तू फेकणे, मारहाण करणे इथपर्यंत त्याची मजल गेली. त्याची पत्नी नीता हिने आई-वडिलांच्या मदतीने केदारला समुपदेशक मानसोपचार तज्ञांकडे नेले. सहा महिन्यांची रजा काढून केदारला गोळया देणे, भोजन, प्रेम, आधार, सहानुभूती बहाल करणे याला तिने विशेष प्राधान्य दिले. संपूर्ण, लक्ष्य केदारकडे देऊन त्याला नैराश्यातून बाहेर काढण्यात नीताला यश आले. त्याचा वेळ जावा (मोकळं मन सैतानाचं घर) व आत्मविश्‍वास वाढावा म्हणून एका ओळखीच्या फर्म मालकाकडे नीताने केदारला कामावर ठेवून स्वतःच्या पर्समधून 20,000/- मासिक पगार - फर्म मालकातर्फे केदारला दयावयास लावला. केदार पूर्णतः बरा झाला. आज एका नामांकित कारखान्यात तो पाच आकडी पगार घेत आहे. नीताने केदारशी पूर्णतः स्वतःला जुळवून घेतलं म्हणून आज केदार व नीताचा संसार उभा राहिला. 

खरोखर मित्रांनो ज्याला जुळवून घेता आलं त्याला सुखी जीवनाचं रहस्य उमगलं. विवेकानंद प्रार्थना करताना म्हणतात, ‘‘हे ईश्‍वरा, या जगात मी जे बदलू शकतो ते बदलण्याची ताकद दे, जे मी बदलू शकत नाही त्याच्याबरोबर जुळवून घेण्याची कुवत मला दे व मी काय बदलू शकतो व काय बदलू शकत नाही हे समजण्याचं शहाणपण मला दे.’’ कुठं जुळवून घ्यायचं व काय बदलायचं हे समजण्यासाठी प्रज्ञेची कास विकसित केली पाहिजे. माणसाच्या आयुष्यात चढ-उतार असतातच, बॅड पॅच असतात. त्यावेळेस त्याला परिस्थितीशी जुळवून घेता आलं पाहिजे. जुळवून घेणे ही एक कला आहे. जुळवून घेण्यास असमर्थ ठरणे हे मानसिक दौर्बल्य आहे. हे दौर्बल्य दूर करण्यासाठी मनाच्या सबलतेची व निर्मलतेची गरज असते. त्याकडे दुर्लक्ष केले तर ही माणसे मानसिक आजारांना बळी पडतात. आपण मुलांना पाहिजे ते त्वरित  पुरवले तर लोकांशी व परिस्थितीशी जुळवून घेण्याच्या त्यांच्या मानसिकतेत आपण अडथळा आणत असतो. मुलांना शाळेत जुळवून घेता आले नाही तर त्यांना शाळेची भिती वाटू लागते.  अभ्यासाशी जुळवून घेता आलं नाही तर न्यूनगंड वाढतो. घरच्यांशी जुळवून घेता आलं नाही कि नात्यात दरी वाढते. अशी मुले पुढं जाऊन सर्वच स्तरावर जुळवून घेण्यास असमर्थ ठरतात. मग त्यांना आयुष्य एक ओझं वाटू लागते. मीच का जुळवून घेऊ ? मीच का तडजोड करू ? अशा विचारांनी ही माणसे समाजातून दूर फेकल्यामुळे एकटी पडतात व नैराश्यात जातात.  केदारला देखील लोकांशी जुळवून घेणे जमत नव्हते. त्यामुळे लोकांशी त्याचा सारखा वाद व्हायचा व हेकेखोर - भांडकुदळया स्वभावामुळे वरिष्ठांपर्यंत त्याच्याबदद्लच्या तक्रारी जायच्या. शेवटी त्याची नोकरी जायची. नीताने मात्र परिस्थितीशी जुळवून घेतले व परिस्थिती बदलण्यासाठी योग्य दिशेने संयम, चिकाटी, धीर न सोडता यथोचित प्रयत्न केले. औषध, गोळया, प्रेम, समुपदेशन, मानसिक आधार यासार‘या अनेक मार्गाचा तिने केदारसाठी वापर केला. केदारची मानसिक स्थिती सुधारल्यावर त्याच्या स्वभावात बदल घडवण्यासाठी नीता-केदारला बरोबर घेऊन विपश्यनेच्या 10 दिवसीय निवासी शिबिरात दाखल झाली. ध्यानाच्या दैनंदिन सरावानंतर केदार जुळवून घ्यायला व संयम राखायला शिकला. आज 5 आकडी पगाराची नोकरी त्याची कायमस्वरूपी झाली आहे व त्याचा संसार सुखाने चालला आहे.  मित्रांनो जीवनात प्रत्येक गोष्ट ही बदलणारी आहे. सुख आले तरी नाचू नका, दुःख आले तरी रडू नका. सुखदुःखात परिस्थितीशी जुळवून आनंदी रहा व जुळवून घेण्याची कला दैनंदिन जीवनात उतरवा. तुमच्या जीवनवेलीवर आनंदाची - सुवासिक फुले दरवळायला लागतील.  म्हणतात ना - ‘‘ दोन घडीचा डाव - *याला जीवन एैसे नाव ।  जुळवून घ्याना राव - जुळवून घ्याना राव

टॅग्स :Relationship TipsरिलेशनशिपAdhyatmikआध्यात्मिक