शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
2
बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान, २० जिल्हे, १२२ मतदारसंघ, ३.७ कोटींवर मतदार
3
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
4
ना स्फोटाच्या ठिकाणी खड्डा, ना मृतांच्या शरीरात सापडले तारा आणि खिळे, या कारणांनी गुढ वाढवलं
5
दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटातील जखमी आणि मृतांची यादी समोर
6
देशातील ७०% कैदी अजूनही दोषी नाहीत, केवळ ८% जणांनाच मिळाली कायदेशीर मदत
7
व्हिडीओत संपादनात चूक, दिशाभूल केल्याचा ठपका, बीबीसीचे प्रमुख संचालक, वृत्त प्रमुखांचा राजीनामा
8
पासवर्ड बदला, अन्यथा डल्ला, ७६ लाख लोकांचा आहे एकच पासवर्ड; पासवर्ड चोरल्यास बसू शकतो फटका
9
निवड समितीसोबतचा पंगा मोहम्मद शमीला भोवणार? कसोटी संघातील पुनरागमन अनिश्चित काळ लांबणीवर जाण्याची शक्यता
10
कंपनीला कर्मचाऱ्यांनीच घातला दीड कोटीचा गंडा, बनावट कॅश व्हाऊचरची छपाई, अतिरिक्त पगार
11
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
12
दिल्लीतील ‘ब्लास्ट’, मागील पाच वर्षांतील केरळनंतरचा ठरला सर्वात मोठा स्फोट
13
लाल किल्ल्याजवळ स्फोट, दुर्घटनेनंतर देश हादरला! राहुल गांधी ते शरद पवार... कोण काय म्हणाले?
14
लाल किल्याजवळील स्फोटाने देश हादरला; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमित शाह यांना फोन, पोस्ट करत म्हणाले-
15
Red Fort Blast Video: अनेकांच्या उडाल्या चिंधड्या! स्फोटानंतरची दृश्ये बघून होईल थरकाप, नेमकी कुठे घडली घटना?
16
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल
17
Red Fort Blast:  कार हळूहळू सिग्नलजवळ येऊन थांबली अन् झाला स्फोट; पोलीस आयुक्तांनी सांगितली घटना
18
लाल किल्ल्याजवळील स्फोटानंतर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट! तपास यंत्रणा सतर्क
19
Delhi Red Fort Blast: मोठी बातमी! दिल्लीत लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट, 8 जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
20
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...

आवडीने भावे हरिनाम घेसी..!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2020 11:02 IST

जिथे यंदा खुद्द माऊली पंढरीची वाटचाल सोडून आपल्या आजोळी मुक्कामी आहे.. तिथे तुम्ही आम्ही कोण..?

बाबा महाराज सातारकर, प्रसिद्ध प्रवचनकार, कीर्तनकार..

महाराष्ट्राची सांस्कृतिक आणि अध्यात्मिक वैभव म्हणजेच पंढरीची वारी होय. भागवत धर्मातील वारकरी संप्रदायातील प्रमुख आचारधर्म म्हणून पंढरीची वारी आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींना ७५० वर्षे तर तुकोबांना ४५० वर्षे झाली आहेत. वारी ही संत ज्ञानदेवपूर्वकालीन आहे. आमच्या कुटुंबात सुमारे सव्वाशे वर्षे वारीची परंपरा आहे.माझ्या जन्मापासून आजपर्यंत कधीही वारी चुकली नाही. माऊलींनी न चुकता वारी घडविली आहे. यंदा कोरोनाच्या महामारीमुळे आषाढी पायी वारी घडू शकणार नाही,  यापेक्षा वारकऱ्यांना दुसरे दु:ख काय असणार? देवाने मोठ्या कौतुकाने सांगितले आहे,‘‘आषाढी कार्तिकी विसरू नका मज,सांगतसे गुज पांडुरंग...’’ देवाने जर सांगितले की मला विसरू नका मज आणि देवच जर वारी चुकवतो तर आम्ही काय करायचे? खरे तर आपण आणि आम्ही सगळे माऊलींच्या मागे आहोत. माऊली जिथे आहेत. तिथे आम्ही आहोत,  माऊली सध्या आळंदीत आजोळ घरी आहेत. आम्हीही आपापल्या घरी बसलो आहोत. जेव्हा पंढरपूरचा मुक्काम येइल.अखिल मानव जातींवर मोठे संकट आले आहे. त्यामुळे पायी वारी होणार नाही. मात्र, आम्ही रोज घरी वाचिक आणि मानसिक वारी अनुभवत आहोत. घरात सर्वजण एकत्र येऊन भजन, कीर्तन त्याचबरोबर वाटचालीतील मुक्कामाची अभंग म्हणत आहोत. तसेच वारीच्या निमित्ताने तासभर निरूपण करत आहोत. माझ्या मते वारकºयांना घरी बसूनही वारी अनुभवता येते. पालखी सोहळ्यापूर्वी अनेकांनी मला फोन केले आणि आम्हाला वारी करायची आहे, अशी इच्छा, अपेक्षा व्यक्त केली. त्या वेळेस मी त्यांना सांगितलं की महामारीमुळे आपल्याला वारी करता येत नाही. कोणीही सरकारी नियमांचे उल्लंघन करू नये, आपण प्रत्येकाने घरी बसूनच वारी करावी. माऊली जर वाटचाल सोडून आळंदीत घरी थांबले असेल, तर तुम्ही आम्ही कोण? वारी सोहळ्यात आपण सगळे माऊलींच्या मागे असतो. त्यांच्या मागे जाणे हे आपले कर्तव्य आहे.खरे तर विठ्ठरायाची पंढरीची वारी चुकू नये? असं सर्वांनाच वाटतं, पण नाईलाज आहे. संत वचनाप्रमाणे, ‘‘हीच माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास, पंढरीचा वारकरी, वारी चुकू न दे हरी’’ अशी सर्वांची आस आणि भावना आहे. 

टॅग्स :PuneपुणेAdhyatmikआध्यात्मिकPandharpur Wariपंढरपूर वारी