शास्त्रज्ञांची दुर्बिण जसजशी मोठी मोठी होत आहे तसतसे त्यांना हे विश्व किती अफाट व अचाट आहे त्याची जाणिव होते आहे.अनंत कोटी ब्रम्हांडात जिथे आपल्या पृथ्वीला स्थान नाही तिथे आपल्या मुंबईला काय स्थान असणार? ...
तुकाराम महाराज आपल्या अभंगात म्हणतात मी दुस-यांच्या दोषांकडे कशाला पाहू माझ्याकडे दोष काय कमी आहेत का.अशी दृष्टी जर असेल तर कोणीही दुस-याचे दोष पाहणार नाही. ...
आमच्या राष्ट्रात दु:ख का याची जी अनेक कारणे आहेत त्यापैकी हे एक मुख्य कारण म्हणजे लोकसंख्येत झालेली प्रचंड वाढ.भ्रष्टाचार वाढण्याचे मुख्य कारण देखील लोकसंख्येत वाढ हेच आहे. ...
दारिद्रय हे आपल्या देशात कमालीचे आहे. घरोघरी जीवनविद्या जावी व लोक सुखी व्हावेत ही आमच्या जीवनविद्या मिशनचे ध्येय तर घरोघरी दारू पोहचली जावी व सर्व लोक दारू पिणारे व्हावेत हे दारूबाज तळीरामांचे ध्येय असते. ...
सुखी होणे सोपे दु:खी होणे कठीण हा विषय अगदी आगळा व वेगळा असा आहे.सुखी होणे सोपे दु:खी होणे कठीण हे वाचल्यानंतर माझी खात्री आहे की तुम्हांला असे वाटले असेल की वामनराव कुठेतरी चुकत आहेत. ...