शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली महिला आयोगातून २२३ कर्मचाऱ्यांना तडकाफडकी काढले; उपराज्यपालांचे आदेश
2
माढा, सोलापूरात महाविकास आघाडीला धक्का; देवेंद्र फडणवीसांच्या खेळीनं भाजपाला फायदा
3
'अस्वस्थ झाला असतात तर ८४ वर्ष जगला नसता';नारायण राणेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर
4
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
5
कोरोना लसीकरण सर्टिफिकेटवरून PM नरेंद्र मोदींचा फोटो गायब? तांत्रिक बिघाड की आणखी काही कारण...
6
अखिलेश यादव यांचा समाजवाद की परिवारवाद? कुटुंबातील एवढे सदस्य लोकसभेच्या रिंगणात 
7
Fact Check : "मोदी जिंकले तर आरक्षण संपुष्टात येईल"; 'ती' क्लिप खोट्या दाव्यासह व्हायरल, जाणून घ्या 'सत्य'
8
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
9
विराट-अनुष्काचा मुलगा 'अकाय' कसा दिसतो? टीव्ही अभिनेता आमिर अली म्हणाला...
10
टेक कंपन्यांत मंदीचे वारे! एप्रिलमध्ये ७०००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले; गुगल, टेस्ला ही यादीत
11
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
12
बलात्कार पीडितेला मदत करणाऱ्या शिक्षकाचं हादरवणारं कृत्य; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
13
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
14
राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या सिनेमामुळे प्रसाद झाला होता कर्जबाजारी; विकावं लागलं घर; म्हणाला, 'कर्जाचे हप्ते, बँकेचे फोन..';
15
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
16
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
17
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
18
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
19
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
20
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात

गुंडेगावातील नवविध नऊ अधिष्ठात्री देवता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2020 2:39 PM

महाराष्ट्रातील साडेतीन शक्ती पीठापैकी एक प्रमुख असलेले शक्तीपीठ तुळजापुरची भवानी माता आहे. या भवानी मातेचे गुंडेगावामध्ये एक जागृत स्मृतीस्थान आहे. दरवर्षी भक्तांची मनोकामना पूर्ण करणाºया या तुकाईमातेचा नवरात्र उत्सव या ठिकाणी आनंदाने साजरा केला जातो. 

अध्यात्म

गुंडेगावातील ऐतिहासिक वैभवात भर टाकणाºया नऊ देवीस्थाने या गावात पहावयास मिळतात. यामध्ये प्रामुख्याने तुकाई देवी (गावचे श्रद्धास्थान), लक्ष्मी आई (मातंग समाजाचे श्रद्धास्थान), फिरंगाई देवी, बारवेची आई, तळ्यातली आई (कुंभाराची देवी), राशिनची आई मंदिर (वडघुल रोड), कोतणची आई (कोतकर मळा), साबळाई देवी (कोळगाव रोड), भिवाई देवी (धनगरांची देवी, वाघदरा, फलटण येथील कांबळेश्वरचे देवीस्थान) याचा समावेश आहे. 

गुंडेगावच्या ग्रामदेवी तुकाई देवी ऐतिहासिक माहिती एका देवीभक्ताची दंतकथा सांगितली जाते. गुंडेगावातील शिंपी परिवारातील देवीभक्त रंगनाथ बाबाजी शिंपी (आजचे चुंबळकर घराणे) यांची शेतीवाडी सांभाळत असताना ते नित्यनेमाने देवीची मनोभावे पूजा करीत असत. दर महिन्याच्या शुक्रवारी तुळजापूर या ठिकाणी देवी दर्शनास जात असत. पायी राशीन या ठिकाणी यमाई देवीचे दर्शन घेण्यासाठी येत असत. असे त्यांचे ही देवी प्रेम वर्षानुवर्षे चालू राहिले. शिंपी बाबा यांची यमाई देवी वर अपार भक्ती होती. त्यांची पत्नी व ते पायवाटेने कर्जत तालुक्यातील राशीन या ठिकाणी मजल दरमजल पायी चालत देवी दर्शनासाठी जात. तेथील तळ्यात स्नान करून बरोबर आणलेला शिधा देवीचरणी ठेवून उरलेला प्रसाद म्हणून घेत. देवीचे दर्शनाचा हा त्यांचा वारी जवळजवळ बारा वर्षे चालू होती. पण त्यांना पोटी मूलबाळ होत नव्हते. त्यांची पुत्रप्राप्तीची इच्छा देवीने जाणली.

शिंपी बाबाच्या पत्नीला दिवस गेले. तरी सुद्धा शिंपी बाबा आपल्या भक्तीत खंड पडू देत नसत. शिंपी बाबाला पत्नीच्या बाळंतपणाची काळजी लागून होती. आपल्या पत्नीने ही चिंता त्यांना सांगूनही त्यांनी यमाईच्या इच्छेपुढे व त्यांच्या देवी भक्तीच्या पुढे चिंता कसली? हे बोलून त्यांनी यमाईच्या नामस्मरणाचा सल्ला पत्नीला दिला. त्यांनी आपली दूरची बहीण बोलवली. बाबांनी नामस्मरणातून त्यांनी देवीला विनंती केली की, माझ्या पत्नीचे बाळंतपण असल्यामुळे मी काही यावेळी तुझ्या देव दर्शनासाठी येऊ शकत  नाही. मला माफ कर. अशातच देवी बाबाला दृष्टांत देऊन सांगितले की, तुला आता येण्याची गरज नाही. मी तुला भेटण्यासाठी व तुझ्या मुलाला पाहण्यासाठी तुझ्या दारी येणार आहे असे स्वप्नरूपी दृष्टांत दिला. मी तुझ्या पाठीमागे येत आहे. तु पुढे चाल. ज्याक्षणी तू वळून मागे पाहशील त्याक्षणी मी अंतर्धान पाऊन त्या ठिकाणी  तांदळा रूपाने राहील. अशा रितीने दुस-या दिवशी शिंपी बाबा चालत चालत गुंडेगाव या ठिकाणी आपल्या शेतापर्यंत आले. परंतु आपल्या मनाची शांतीसाठी देवी खरोखरच आपल्या पाठीमागे आली आहे का ? हे त्यांनी वळून पाहिले. यानंतर देवी क्षणात अंतर्धान पावली. त्या ठिकाणी एका तांदळा रुपाने तयार होऊन देवी आजही गुंडेगावातील लोकांना आपल्या कृपेने रक्षण करत आहे, अशी अख्यायिका जुने जाणते नागरिक सांगतात. 

 या ठिकाणी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहून सार्वजनिक वर्गणी करून कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी जागरण गोंधळाचा कार्यक्रम करून सर्व गावातील लोकांना महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित केला जातो. नवरात्रौत्सवानिमित्त नऊ दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. भाविकांची मोठी उपस्थिती असते. परंतु यंदा कोरोनाचे सावट आहे. हे सावट लवकरच दूर व्हावे, असे साकडे भाविकांनी देवीला घातले आहे. 

-दादासाहेब आगळे, सामाजिक कार्यकर्ते, गुंडेगाव, ता. नगर.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरAdhyatmikआध्यात्मिकNavratriनवरात्री