शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

पंढरीसी जावे ऐसे माझे मनी। विठाई जननी भेटे केव्हा॥

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2019 17:13 IST

 वाट दिवेघाटाची 

वारकरी पंढरीची ओढ मनामध्ये निर्माण करून श्रद्धापूर्वक अंत:करणाने पायी चालत पंढरपूरकडे मार्गस्थ होतात. आळंदी, पुणे मुक्कामी विसावल्यानंतर सासवडकडे जाण्यासाठी मोठ्या उत्साहात पुढे मार्गस्थ होतात. कारण, दिवेघाटाची ओढ सर्व वारकरी भाविकांना आकर्षित करते. दिवेघाट हा नैसर्गिकरीत्या खूपच सुंदर असून वाटचाल करताना जर पाऊस आला तर दुधात साखर याप्रमाणे वारकरी भाविकांना होणारा आनंद द्विगुणित होतो आणि यंदा तसेच झाले.

दिवेघाटातून पालखी मार्गस्थ होताना पावसाच्या हलक्या सरी सुरू झाल्या आणि वारकरी भाविकांची चालण्याची गती वाढू लागली. पाऊस सुरू झाल्यामुळे पावसाचा ओलावा आणि वारकºयांच्या मनामध्ये असलेला भावाचा ओलावा यांचा संगम झाल्यामुळे वारकरी भाविकांचा उत्साह चेहºयावरूनओसंडत होता ‘आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदचि अंग आनंदाची’ या संत वचनाप्रमाणे वारकरी भाविकांच्या मनातील श्रद्धा क्रियेतून ओसंडत होती. दिवेघाटामध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीला वेगवेगळ्या बैलजोडी जोडलेल्या असतात.

परंपरेने त्या भागातील शेतकºयांच्या बैलजोडीला मान दिला जातो. त्या परिसरातील शेतकरी पालखीला बैलजोडी लावल्यामुळे खूपच आनंदी होतात. कारण, आपली बैलजोडी पालखीला लावल्यामुळे स्वत:ला भाग्यवान समजतात. दिवे घाटातून पालखी वर घेऊन जाण्यासाठी पुणे शहरातील अनेक तरुण-तरुणी सहभागी होऊन पालखीला घाटातून पार करण्यासाठी मदत करतात. तरुणांचाही उत्साह पाहण्यासारखा असतो. सध्या विज्ञानाने प्रगती झालेली असतानासुद्धा तरुणवर्ग मोठ्या प्रमाणामध्ये पालखीमध्ये सहभागी असतो. कारण माऊलींच्या सेवेचा आनंद तरुणांना आकर्षित करतो. दिवेघाटातून पालखी मार्गस्थ होत असताना नैसर्गिकरित्या व आध्यात्मिक दृष्टीने मनाची उंची वाढलेली असते. त्यामुळे दरवर्षी दिवेघाटातून पालखी जाताना आपण पालखीबरोबर असावे, असे अनेक तरुणांना व वारकºयांना वाटत असते. दिवेघाटातून पालखी पुढे मार्गस्थ होते. त्यावेळी वारकरी भाविक थकले असले तरी त्यांच्या मनातील आनंद त्यांना त्यांच्या शारीरिक थकव्याकडे लक्षही जाऊ देत नाहीत.

दिवेघाट पार केल्यानंतर तो आनंद घेऊन ही सर्व वारकरी मंडळी पुढे सासवडला दोन दिवसांच्या मुक्कामी थांबतात. सासवड संत सोपानदेवांचे समाधी गाव आहे. या स्थानावरून संत सोपानकाका यांची पालखी आषाढी वारीनिमित्त पंढरपूरकडे प्रस्थान करते आणि त्या प्रस्थानाला सर्व वारकरी भाविक, दिंडीप्रमुख उपस्थित असतात हा सोहळा पाहण्यासाठी आवर्जून भाविकांची गर्दी झालेली असते. सासवडला पोहोचल्यानंतर वारकरी भाविकांना खूप समाधान लाभते. कारण चालत असताना आळंदी ते पुणे व पुणे ते सासवड हे दोन मुक्कामाचे टप्पे खूपच लांब असल्यामुळे वारकºयांना मार्गावरील बरेच अंतर कमी झाल्याचे समाधान लाभते. तो भाविक सोयीसुविधांचा विचार न करता नामस्मरण, भजन करत पंढरीची वाट चालत राहतो. त्यामुळे या वारीला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. - सुधाकर इंगळे महाराज

टॅग्स :SolapurसोलापूरAdhyatmikआध्यात्मिकPandharpur Vitthal Rukmini Templeपंढरपूर विठ्ठल रूक्मिणी मंदीर