शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

मन हे इंद्रियांपेक्षा श्रेष्ठ...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 02, 2019 4:45 PM

बुद्धी ही सारासार विचार करणारी (व्यवसायात्मक), तर मन हे विस्तार करणारे (व्याकरणात्मक) आहे.

मनाचे स्थान नेमके कोणते याचा विचार केल्यास त्याचे कार्य काय याचाही किंचित उलगडा होऊ शकतो. मनाच्या स्थानाचे थेट वर्णन भगवद्गीतेत सापडते. गीतेतील तिसºया अध्यायातील ४२ व्या श्लोकात सूक्ष्म इंद्रियांची क्रमवारी वर्णन केली आहे. क्रमवारीत सर्वात निम्न स्तरावर इंद्रिये आहेत. त्यांचे कार्य सर्वात कनिष्ठ दर्जाचे असते. मन हे इंद्रियांपेक्षा श्रेष्ठ आहे.

मनाहून श्रेष्ठ बुद्धी आहे, तर त्याहून आत्मा सर्वश्रेष्ठ आहे. या क्रमवारीत आत्म्याचे स्थान सर्वोच्च आहे. म्हणजेच, मनाचे स्थान इंद्रिये व बुद्धी यांच्या दरम्यान आहे. आचार्य विनोबा भावे म्हणतात, मन हे इंद्रिय व बुद्धी यांना जोडण्याचं काम करते. तराजूची कल्पना केल्यास, पारड्यात एका बाजूला इंद्रिये, तर दुसºया बाजूला बुद्धी असते व तराजूच्या बरोब्बर मध्यभागी मन असते. यावरून आपण इतका अंदाज लावू शकतो कि, मनाचे कार्य इंद्रियांहून श्रेष्ठ दर्जाचे परंतु बुद्धीशी तुलना करता कमी दर्जाचे आहे.

मनाचे काम समजून घेण्यासाठी आपल्याला मनाबरोबरच इंद्रिये व बुद्धी यांचाही विचार करावा लागेल. इंद्रिये बहिर्मुख असतात. भौतिक सृष्टीतील निरनिराळ्या गोष्टींशी इंद्रियांचा संपर्क येतो. बाह्य सृष्टीतील या गोष्टींनाच विषय असे संबोधतात. या विषयांशी संबंध आल्यावर ज्ञानेंद्रिये त्याची माहिती मनाला देतात. त्यावरून मन आवड झ्र निवड ठरवते. या आवडी-निवडीनुसार मन ती माहिती बुद्धीसमोर मांडते. तकार्ला अनुसरून बुद्धी त्यावर कर्म अ कर्माचा (एखादी क्रिया करावी कि करू नये याचा) निर्णय घेते व तो मनाला सांगते. बुद्धीने दिलेल्या निर्णयानुसार मन इंद्रियांकडून कार्य करवून घेते. महाभारतातील शांतिपर्वात एका श्लोकात मन व बुद्धीचे वर्णन करताना म्हटले आहे, व्यवसायात्मिका बुद्धि: मनो व्याकरणात्मक अर्थात, बुद्धी ही सारासार विचार करणारी (व्यवसायात्मक), तर मन हे विस्तार करणारे (व्याकरणात्मक) आहे.- अजिंक्य नावरे

टॅग्स :SolapurसोलापूरAdhyatmikआध्यात्मिक