शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

मन:शांती- सर....मी लग्न करणार नाही...!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2019 21:10 IST

ती म्हणाली. वडील आईला खूप मारझोड करायचे, शिवीगाळ करायचे, गुलामासारखं जीवन ती जगली..

डॉ. दत्ता कोहिनकर रविवारची सुट्टी सकाळीच टी.व्ही. वर गाणे चालू होते, अकेले अकेले कहाँ जा रहे हो - अकेले अकेले कहाँ जा रहे हो । मेरे साथ आओ - कहॉ जा रहे हो ॥ गाणे ऐकताच मला निलिमाची आठवण झाली. निलिमा ही उच्चशिक्षित - अत्यंत देखणी - हुशार संगणक अभियंता म्हणून नामांकित कारखान्यात काम करणारी मुलगी. लग्नाचा विषय काढला की, लग्न करायचे नाही म्हणते.  या विषयाने चिंतित झालेली निलिमाची आई-निलिमाला माझ्याकडे घेऊन आली होती.  निलिमाच्या चेहऱ्यावर नैराश्य पण जाणवत होतं.  निलिमाशी वैयक्तिक संवाद साधताना तिच्या लहानपणापासून आई-वडिलांच्या भांडणाचा तीव्र परिणाम तिच्या अंर्तमनावर झालेला जाणवला.  ती म्हणाली. वडील आईला खूप मारझोड करायचे, शिवीगाळ करायचे, गुलामासारखं जीवन ती जगली. स्वत:च्या आयुष्यात तिला कुठलीही गोष्ट मनासारखी करता आली नाही.  कामवाली - उपभोगाची दासी असा दुय्यम दर्जा तिने आयुष्यभर सोसला. माहेरच्यांनी पण तिला घरात स्थान दिले नाही.  गुराढोरासारखं जीवन ती जगली. सर लग्न म्हटलं कि मला भितीच वाटते. मी अध्यात्मात आयुष्य काढायचं ठरवलंय सर. सर्व ऐकून घेतल्यावर मी तिला म्हणालो, हे बघ निलिमा तु आईच्या काळी स्त्रिया स्वत:च्या पायावर उभ्या नव्हत्या.  तू आज 50,000/-रू. प्रतिमहा कमावतेस. त्यावेळी स्त्री ही चुल व मुल यापुरतीच होती. तिला दुय्यम दर्जा असायचा. आज स्त्री-पुरूष समानतेचे युग आहे. त्याकाळी स्त्रीयांच्या संरक्षणासाठी कायदे फारसे कडक नव्हते.  आज स्त्रीयांसाठी त्यांचा छळ होऊ नये म्हणून कायदेशीर विशेष विभाग शासनाने निर्माण केले आहेत. पूर्वी स्त्री ज्या घरी दिली तेथे तिला कितीही त्रास झाला तरी ते घर तिला सोडता येत नसे. माहेरची लोक इज्जतीसाठी तिला स्वीकारायला नाकारत असत.  आज माहेरच्या लोकांनी आपल्या मुलीला आपल्या घराचे दरवाजे केव्हाही खुले ठेवले आहेत. अमेरिकेत नुकत्याच प्रकाशित झालेल्या अहवालानुसार ६० % मनोरूग्ण हे त्यांचे कामजीवन उध्वस्त झाल्यामुळे झालेले आहेत. संत तुकाराम महाराज म्हणतात ... आशा ही समूळ खणोनी काढावी, तेव्हाची गोसावी व्हावे तेणे ॥ त्यामुळे मनातील विकाराचं दमन करून मनोरूग्ण होण्यापेक्षा निसर्गाच्या नियमांचे पालन करणे हिताचे असते. निलिमा जीवन ही एक अनुभवमालिका असते.  प्रत्येकाचे अनुभव-कर्मफळ वेगळे असते. ते स्वत: स्वत:नेच घ्यावयाचे असतात. शेत म्हटले कि पिकाबरोबर तण येणारच, घर म्हटले कि तूतू-मैंमैं होणारच, गुलाबाला पण काटे असतातच. अनुकूल व प्रतिकूल, सुख आणि दु:ख, ऊन आणि सावली अशा परस्परविरोधी अनुभवांचा आकृतीबंध म्हणजे जीवन.  बहिणाबाईंची कविता तू ऐकलीच असेल, अरे संसार-संसार । त्याला कधी रडू नये। गळयातल्या हाराला । लोढणे कधी म्हणू नये ॥ या सगळया चचेर्नंतर निलिमाला मी म्हणालो -एक डाव खेळून तर बघ निलिमाने आत्मचिंतन केले व ती लग्नाला तयार झाली.  महिन्यातच तिच्याच कारखान्यातील तिला आवडणाºया अभियंत्याशी तिचे लग्न ठरले. लग्नपत्रिकेत प्रेषक म्हणून माझे नाव झळकत आहे.

(लेखक व्याख्याते आहे.

टॅग्स :PuneपुणेAdhyatmikआध्यात्मिकmarriageलग्नMeditationसाधना