शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
2
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
4
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
5
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
6
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
7
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
8
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
9
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
10
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
11
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
12
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
13
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
14
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
15
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
16
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
17
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
18
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
19
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
20
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप

आत्माग्नीमधील सात आहुतींद्वारे मनुष्य शुद्ध, पवित्र आणि पौष्टिक होतो

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2019 7:55 AM

जीवनात प्रत्येक व्यक्ती प्रतिष्ठेसाठी जगत असते. प्रतिष्ठेची कामना करते.

-डॉ. तुळशीराम गुट्टे महाराजजीवनात प्रत्येक व्यक्ती प्रतिष्ठेसाठी जगत असते. प्रतिष्ठेची कामना करते. सर्वजण प्रतिष्ठित होऊ इच्छितात; परंतु प्रतिष्ठेसाठी काय करावे लागते याची सर्वांनाच जाणीव असते की नाही हे सांगता येत नाही. जीवन हासुद्धा एक यज्ञ आहे. त्यामध्ये आत्माग्नी प्रस्थापित आहे. यामध्ये दोन डोळे, दोन कान, दोन नाकपुड्या, एक मुख या त्या आत्माग्नीमध्ये आहुती देणाऱ्या आहेत. डोळे हे दर्शन घडवू शकतात. कान ऐकू शकतात. नाकपुड्या प्राणवायू खेचतात व सोडतात. मुख जल, अन्नाची आहुती देतात. या सातही अवयवांद्वारे आत्माग्नीमध्ये आहुती टाकल्या जातात. या सात आहुतींद्वारे मनुष्य शुद्ध, पवित्र आणि पौष्टिक होतो. जेव्हा पौष्टिक होतो तेव्हा दुर्गुण त्यागून वृत्ती निष्कपट बनते. मन प्रसन्न राहते. ज्ञान-विज्ञान-शुद्धता, पवित्रता, विद्या, भक्ती-श्रद्धा इत्यादी चांगल्या गुणांचा स्वीकार करते. मग हे गुण अंगी आले की व्यक्ती प्रतिष्ठित होतो. प्रतिष्ठित व्यक्ती म्हणून त्याची समाजात गणना होते. त्याच्या मनातून तो मल-विक्षेप-आवरण या दोषांना घालवतो. त्याच्यात तो बदल करतो. तप व तेजाची स्थापना तो आपल्या मनात धारण करतो. शुद्ध, पवित्र जीवन जगतो. परोपकारी बनतो. जीवनात संकटरूपी वादळे अनेक आली तरी त्याला साहसी वृत्तीने सामोरे जातो. आपल्या सद्गुणी वृत्तीमुळे अनेक विकारांवर विजय मिळवतो. अज्ञानी वृत्तीला नष्ट करतो. आपले जीवन यशस्वी करतो आणि समाज, देश, राष्ट्र, परिवार, संस्था इत्यादींमध्ये मानाचे स्थान मिळवतो. तो अखंडपणे आपल्या कार्यात मग्न राहतो. सतर्कता त्याची मूळ वृत्ती बनते. संसाररूपी घटनाचक्राचा नेहमी वेध घेतो. निरंतर तो आपल्या कर्तव्यपरायणतेत मग्न असतो. तो सतत निर्विषय व निर्विकार होऊन साधना करतो. त्या प्रतिष्ठित व्यक्तींची महानता त्यातच गुपित असते. मानवी जीवनात तो उच्चतम साधनेपर्यंत पोहोचतो. त्याची कीर्ती वा-यासोबत चालते. तो आपल्या कर्तृत्वाने संसाररूपी जीवनात कीर्तीरुपी सुगंध पसरवितो. मनात मोठी महत्त्वाकांक्षा ठेवून काम करतो. कारण महत्त्वाकांक्षा हीच त्याच्या महानतेची सृजनशक्ती असते. म्हणून प्रतिष्ठित बना. सुसंस्कारी व्हा व जीवनाचा आनंद घ्या, मग मन प्रसन्न होईल.(संत साहित्याचे अभ्यासक व सिद्धिविनायक मानव कल्याण मिशनचे अध्यक्ष)

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक