शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
4
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
5
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
6
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
7
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
8
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
9
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
10
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
11
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
12
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
13
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
15
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
16
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
17
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
18
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
19
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
20
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा

कर्माचे फळ भाग्यानेच मिळत असते...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2019 5:54 PM

- ह.भ.प. भरतबुवा रामदासी (बीड) प्रपंच आणि परमार्थ दोन्हीकडे पण भाग्य लागतेच कारण कर्माचे फळ भाग्यानेच मिळत असते. याचा ...

- ह.भ.प. भरतबुवा रामदासी (बीड)

प्रपंच आणि परमार्थ दोन्हीकडे पण भाग्य लागतेच कारण कर्माचे फळ भाग्यानेच मिळत असते. याचा अर्थ असा नाही की, प्रयत्नाला काही अर्थ नाही. प्रयत्न तर करायलाच पाहिजे. माठ मातीपासून घडत असला तरी, मातीवर कुंभाराला आकार द्यावाच लागतो. माऊली म्हणतात -भाग्य जै सानुकूल । केले उद्यम सदा सफळ ॥संत म्हणतात, भाग्याची अनुकूलता असेल तर प्रयत्नाला फळ प्राप्त होते. विचार करा दोघेजण जिवश्च कंठश्च मित्र आहेत. दोघांनी एकाच दिवशी व्यवसाय सुरू केला पण एकाला त्या व्यवसायात भरपूर फलप्राप्ती झाली व दुसरा मात्र पार उद्ध्वस्त झाला, असे का..? ज्याची भरभराट झाली त्याचे दैव अनुकूल होते व ज्याचे दिवाळे निघाले त्याचे दैव प्रतिकूल होते. थोडक्यात काय तर, प्रयत्नाला देखील दैवाची अनुकूलता लागतेच. संत तुकोबा म्हणतात -प्रारब्धेची जोडे धन । प्रारब्धेची वाढे मान ॥आपला विषय भाग्य प्रपंचात ही लागते व परमार्थात ही लागतेच परंतु प्रपंचातल्या भाग्याची कल्पना वेगळी व परमार्थातल्या भाग्याची कल्पना वेगळी. प्रपंचात ज्याच्याजवळ भरपूर श्रीमंती, बंगला, गाडी, जमीन जुमला, पदप्रतिष्ठा, मानमरातब असेल त्याला समाज भाग्यवंत समजतो पण परमार्थातील भाग्याचा विचार करतांना संत म्हणतात -भाग्यवंत म्हणू तया । शरण गेले पंढरी राया ॥भगवंत प्राप्तीसाठी जे साधना करतात, त्याला संत भाग्यवंत म्हणतात. पंढरीनाथाला जे अनन्य भावाने शरण गेले ते खरंच भाग्यवंत. संसारातल्या लौकिक पदार्थाच्या प्राप्तीसाठी साधना करणं आणि तो पदार्थ प्राप्त होणं हे संसारिकासाठी भाग्य आहे. तसं देव प्राप्तीसाठी साधना करणं आण िदेव प्राप्त होणं हे परमार्थिकासाठी भाग्य आहे.एकनाथ महाराज म्हणाले -भरतखंडी नरदेह प्राप्ती । हे तो परम भाग्याची संपत्ती ॥

भारतवर्षांत नरदेह मिळाला हेच परम भाग्य आहे. नरदेह मिळाल्यानंतर अध्यात्मिक साधना करून देव मिळवला हे आणखी दुसरे भाग्य कारण परमेश्वर प्राप्तीचे ज्ञान इतर देहांत नाहीच म्हणून तर तुकोबा म्हणतात - भाग्यवंत म्हणू तया । शरण गेले पंढरी राया ॥बाकीच्या देहांत देखील आहार, निद्रा, भय, आणि मैथून या क्रि या आहेतच. विषय सुखाचा विचार इतर देहात आहेच. फक्त उध्दाराचे ज्ञान इतर देहांत नाही ते फक्त याच देहात आहे. परमभाग्याने हा मानव देह मिळाला आहे तर, विषय सुखाच्या मागे न लागता परमात्मा स्वरूपाशी तदरु प होणं ह्यालाच संत भाग्यवंत म्हणतात. माऊली म्हणतात - हे तो विषय वैराग्य । आत्मलाभाचे भाग्य ॥

( लेखक राष्ट्रीय कीर्तनकार आहेत, मोबाईल क्र. -  9421344960 )

टॅग्स :spiritualअध्यात्मिकAdhyatmikआध्यात्मिक