शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
3
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
4
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
5
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
6
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
7
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
8
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
9
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
10
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
11
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
12
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
13
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
14
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
15
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
16
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
17
'सिंघम 3' च्या सेटवरुन अजय देवगण-जॅकी श्रॉफचा फाईट सीन लीक, व्हिडीओ व्हायरल
18
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
19
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
20
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 

ज्ञानमोचक

By ऑनलाइन लोकमत | Published: March 05, 2019 4:25 AM

मराठीचे आद्य गद्य लेखक म्हाइंभटाने स्वामींना एकदा प्रश्न विचारला, ज्ञानाचं काय लक्षण? स्वामींनी ‘ज्ञानमोचक’ हे सूत्र सांगून उत्तर दिलं.

- बा.भो. शास्त्रीमराठीचे आद्य गद्य लेखक म्हाइंभटाने स्वामींना एकदा प्रश्न विचारला, ज्ञानाचं काय लक्षण? स्वामींनी ‘ज्ञानमोचक’ हे सूत्र सांगून उत्तर दिलं. जे अधीन, अज्ञान व अविद्या बंधनं तोडतं ते ज्ञान. हे त्याचं लक्षण आहे. या तीनच बंधनांत जग अडकलं आहे. जे दिसत नसतात पण असतात. प्रेम दिसत नाही पण बंधन असतं. धाक दिसत नाही पण बंधन असतं. कायदा दिसत नाही पण बंधन आहे. विकार दिसत नाही पण त्यांचा आपल्यावर ताबा असतो. तनाच्या, मनाच्या, जनाच्या, धनाच्या सर्वच अधीन असतात. ‘पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा’ या ग.दि.मा.च्या काव्यात सुरेख वर्णन केलं आहे. जो शब्द लक्ष्याचं लक्षण सांगतो त्याला शास्त्रात लक्षण म्हणतात. सूत्रात मोचक या क्रियापदाने ज्ञानाचं लक्षण सांगितलं आहे. खरं तर, भटाला ज्ञानाचं लक्षण आधीच ठाऊक होतं. कारण स्वामींच्या पहिल्या भेटीत जो संवाद झाला. त्यात ‘ज्ञानउदयें मोक्षु’ असं त्यांनीच उत्तर दिलं आहे. पुन्हा ‘ज्ञानादेव तु कैवल्यं! ज्ञात्वादेवं मुच्यते सर्वपाशै:’ या वेद उपनिषदाने केलेल्या व्याख्या त्यांना माहिती होत्याच. गीतेने ज्ञानाचं विस्तारपूर्वक केलेलं विवेचनही त्यांना कळलं होतं. मग तोच प्रश्न पुन्हा का विचारला? तर, अधिकार वाणीतून ‘ज्ञानं मोचकं’ याचा मराठी अनुवाद त्यांना ऐकण्याची इच्छा असण्याची शक्यता नाकारता येत नाही. वैखरीला परेचा स्पर्श व्हावा असं कुणाला वाटत नाही. हे सूत्र म्हणजे प्रकाशाचा पुंज आहे. सूत्रसृष्टीत तळपणारा तापहीन सूर्य आहे. अज्ञान व आशापाशांनी जखडलेल्या जीवांना मुक्तीमार्ग दाखवणारा दीपस्तंभ आहे. आणखी एका सूत्रात स्वामी ज्ञानाचं लक्षण सांगताना म्हणतात,‘‘जे जैसे असे ते तैसे जाणिजे ते ज्ञान’’यात स्वामींनी यथार्थ ज्ञानाचा परिचय करून दिला आहे. ज्ञान सत्य असतं, मिथ्या नसतं. जे जसं आहे ते तसंच जाणणं याचं नाव ज्ञान. ते आरशासारखं सत्य दाखवतं खोटं बोलत नाही. ते ज्ञान अग्नीसारखं निर्दोष, पाण्यासारखं निर्मळ व तलवारीसारखं धारदार आहे. गीतेने त्याला नौका व पवित्र म्हटलं आहे. ज्ञानाने कुणालाही कधीच फसवलं नाही. ज्ञानापासून साध्या लोकांना वंचित ठेवणारा वर्ग वेगळाच आहे. त्यांनीच अज्ञानाच्या अंधारात ठेवलं व मिथ्या ज्ञानाने आपल्या अनेक पिढ्या बरबाद केल्या. आम्ही माहितीला ज्ञान समजतो ती अचूक नसते. तिच्यावरचा विश्वास आंधळा असतो. देव भगताच्या अंगात येतो. कोंबडा, बकरा मागतो. कुणी अंगातल्या देवाला देवत्वाचा पुरावा मागत नाही. गाडगेबाबा कीर्तनात म्हणायचे, ‘‘असा कसा तुमचा देव, घेतो बकराचे जीव.’’ बळी घेणारा देव दयाळू कसा? शुद्ध बुद्ध देव घाणेरड्या देहात कसा? देव उदार. तो नारळ नैवेद्याची भीक कसा मागतो? तो धरतो म्हणे. तो पोलीस का लुटारू, ही तर खंडणी झाली. मुक्तीची भाषा करणारा व अडचणीत आणतो. देव कृपाळू मांसाहारी कसा? श्रद्धेला पुरावा लागतो, अंधश्रद्धा अफवेवर पोसली जाते. अफवा सोडणे हा अन्यथा ज्ञानाचा जोरात चालणारा धंदा आहे. पण असत्य हे कदापिही विज्ञानाच्या प्रयोगशाळेत टिकत नाही. ‘सत्यमेव’च जयते. स्वामी एक सुंदर गोष्ट सांगतात, दोन गुरुबंधूंना एक डुक्कर दिसलं, एक म्हणतो हा मोठा उंदीर आहे. दुसरा म्हणतो हत्तीचं लहान पिल्लू आहे. दोघांचा वाद होतो. सत्य कळावं म्हणून डुकराला गुरूकडे नेतात. आपलं मत सांगतात, गुरू म्हणतो, मी तुम्हाला एवढं ज्ञान दिलं, पण व्यर्थ. अरे हे डुक्कर नाही व हत्तीचं पिल्लूही नाही हा पक्षी आहे. स्वामी हसून म्हणतात, शिष्य जुळतंमिळतं बोलले, पण गुरूने असत्याची हद्द पार केली.