शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

जैन धर्म विज्ञान आधारित, भक्तामर गाथांमध्ये मोठी शक्ती - विजय दर्डा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2021 5:23 AM

आंतरिक यात्रेत ऑनलाइन कार्यक्रमाचे आयोजन, १२ मेपर्यंत उपक्रम चालणार

नागपूर : जैन धर्म पूर्णतः विज्ञानावर आधारित आहे. आचार्य मानतुंग यांनी पहिले तीर्थंकर भगवान आदिनाथ यांच्या स्तुतीत रचलेल्या भक्तामर गाथांमध्ये मोठी शक्ती आहे, असे प्रतिपादन सकल जैन समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष, लोकमत वृत्तपत्र समूहाच्या एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन व माजी खासदार विजय दर्डा यांनी केले. सिद्धायतन संस्था, संगम फाऊंडेशन, आयव्हीएस हीलिंग सेंटर आणि जीतो लेडीज विंग, रायपूर यांच्या वतीने कोविडच्या दुसऱ्या घातक लाटेमध्ये भक्तामर हीलिंगद्वारे व आपली दिव्य शक्ती जागृत करून सकारात्मक ऊर्जेसोबत महामारीच्या प्रकोपापासून वाचण्यासाठी आयोजित सात दिवसीय आंतरिक यात्रेच्या ऑनलाईन कार्यक्रमादरम्यान शनिवारी मुख्य अतिथी म्हणून दर्डा बोलत होते.

भक्तामरची सहावी गाथा बुद्धीच्या विकासात यशस्वी झाली आहे. कुठली गोष्ट हरविली असेल तर अकराव्या गाथेतून यश मिळते.  ४५ वी गाथा आजारांचा सामना करण्यात प्रभावी असल्याचे सिद्ध झाले आहे. काही लोकांनी कर्करोगासारख्या आजारातदेखील या गाथेचा प्रयोग केल्याची मला जाण आहे, मात्र त्या माध्यमातून चांगले-वाईट झाले आहे. याचे प्रमाण नाही. केवळ मान्यता आहे. त्यामुळेच तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने जी औषधे घेत असाल ती कायम ठेवा, ती बंद करू नका, असे प्रतिपादन दर्डा यांनी केले. यावेळी त्यांनी क्षमा, जगा आणि जगू द्या तसेच अपरिग्रहाच्या महतीवरदेखील प्रकाश टाकला.

सात दिवसीय आंतरिक यात्रा कार्यक्रमाच्या ऑनलाईन आयोजनाला ६ मे रोजी सुरुवात झाली. हा उपक्रम १२ मेपर्यंत चालेल. डॉ. मंजू जैन यांनी भक्तामर पाठ देशविदेशातील जैन व इतर धर्मीय बांधवांना विविध केंद्रांच्या माध्यमातून पोहोचविण्याचे कार्य केले आहे. नागपुरातदेखील मोठी प्रयोगशाळा बनते आहे. तेथे या सर्व गाथांच्या माध्यमातून प्रयोग होणार आहेत. या आयोजनात इंटरनॅशनल स्पिरिच्युअल हीलर डॉ. मंजू जैन आणि वेलनेस कोच-स्पिरिच्युअल हीलर सोनल जैन-जैसवाल या कोरोना महामारीदरम्यान भक्तामर हीलिंग आणि अंतर्गत शक्ती जागृत करण्यासंदर्भात उपाय सांगत आहेत.

कार्यक्रमात मधुस्मिताजी म. सा., प्रेरणाजी म. सा. यांच्यासमवेत सिद्धायतन संस्थेच्या मॅनेजिंग ट्रस्टी ललिता जैन सेठी (कोलकाता), संगम फाउंडेशनच्या संस्थापक नीरज सुराणा, आयव्हीएस हीलिंग सेंटरचे संचालक विनय जैन, जीतो लेडीज विंग, रायपूरच्या अध्यक्षा कुसुम श्रीश्रीमाल, विशाखापट्टणमचे उद्योगपती मनोज जैसवाल यांच्यासमवेत शेकडो समाजबांधव सहभागी झाले होते. सीए संतोष जैन (कोलकाता) यांनी मुख्य अतिथींचा परिचय करून दिला. मधुस्मिताजी म.सा. यांनी मंगलाचरण व प्रार्थना केली. कार्यक्रमाचे संचालन नीरज सुराणा यांनी केले.

चक्रांचे सांगितले महत्त्वसोनल जैन-जैसवाल यांनी कुंडलिनीतील मूलाधार, स्वाधिष्ठान, मणिपूर, अनाहत, विशुद्धी, आज्ञा, सहास्रार या सात चक्रांबाबत माहिती दिली. जसजसे चक्र खुलत जातात, तसतसे आपले भाव शुद्ध होत जातात व आपल्याला आतून सुख-शांतीची अनुभूती होते, असे त्यांनी सांगितले. भगवंत सर्वांच्याच आत आहेत. त्यांना मिळविण्यासाठी मन स्वच्छ व भाव पवित्र आले पाहिजेत. जे मनात आहे तेच तोंडीदेखील असले पाहिजे, असे प्रतिपादन मनोज जैसवाल यांनी केले.

आत्म्याला जागृत करा भक्तामर स्तोत्राच्या एकेका श्लोकात अपार शक्ती आहे. यातून नकारात्मकता दूर होऊन आयुष्यात सकारात्मकता येते. या मंत्रामुळे लोकांचे आजार, सुख, बुद्धिमत्ता आणि समृद्धीसोबतच आयुष्याला पूर्ण तऱ्हेने यशस्वी बनविण्यासंदर्भात प्रभाव टाकतात. या मंत्रांच्या माध्यमातून आत्म्याला जागृत करता येते, असे मंजू जैन यांनी सांगितले. 

टॅग्स :Vijay Dardaविजय दर्डाspiritualअध्यात्मिक