शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

आपल्या विचारांचा समाेरच्यावर सुद्धा हाेताे परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2019 8:21 PM

चांगला विचार केल्यास चांगल्या व्यक्ती व चांगल्या स्थितीला आपण आकर्षित करत असताे.

एक राजा आपल्या लवाजम्यासह चालला असताना एक इसम समोरून आला . राजाची व त्याची नजर एकमेकांना भिडली , त्वरित राजाने त्यांच्याकडे बोट दाखवून क्रोधाने, त्या इसमाला पकडा , मारा व जेलमध्ये टाका अशी सैनिकांना आज्ञा केली . राजाज्ञा होताच सैनिकांनी त्याला पकडून मारत मारत तुरुंगात टाकले . दुसऱ्या दिवशी प्रधानाने राजाला त्या इसमाला तुरुंगात टाकण्याचे कारण विचारले , तेव्हा राजाला याचे कारण काहीच सांगता येईना . राजा म्हणाला ,प्रधानजी , काय कळलं नाही पण तो समोर दिसला आणि मला खूप राग आला . क्रोधीत अवस्थेत मी भान हरपल्यामुळे त्याला पकडा , मारा , आत टाका असे म्हणालो . यावर तुम्हीच काय तो निर्णय त्याच्याबाबतीत घ्या , आध्यात्मिक वृत्तीच्या प्रधानाने तुरुंगात जाऊन त्या माणसाची चौकशी सुरू केली . 

तेव्हा तो माणूस प्रधानाच्या प्रश्नांना उत्तर देत म्हणाला , साहेब राजाने मला मारायला व तुरुंगात टाकायला का सांगितलं माहीत नाही , पण माझ्या मुलीच्या लग्नासाठी पैशाची गरज आहे . माझ्याकडे तिच्या लग्नकार्यासाठी पैसे नाहीत . पण चंदनाची लाकडे आहेत . पण ही लाकडे कोण विकत घेणार ? हा विचार चालू असताना राजा लवाजाम्यासाह समोरून येताना दिसला व चटकन माझ्या मनात विचार आला , हा राजा जर मेला तर माझी चंदनाची लाकडे खपतील . कारण राजाला चंदनाची चिता रचावी लागते . तेवढ्याच राजाने आज्ञा केली व मला सैनिकांनी मारत - तुरुंगात टाकलं. प्रधानाला अज्ञात गोष्टीचा उलगडा झाला . त्या माणसाच्या राजाविषयीच्या नकारात्मक व हानीकारक विचारांनी राजाला आतून अस्वस्थता व बेचैनी निर्माण झाली , म्हणून राजाने पकडा - मारा - आत टाका ही आज्ञा केली . खरोखर आपण समोरच्या माणसाविषयी मनात करत असलेल्या विचारांचा पण त्याच्यावर परिणाम होतो , म्हणून मन एखाद्याविषयी वाईट विचार करू लागले , कि त्याला विचारा - एक क्या बोलता तू ? व सावध व्हा .आपण समोरच्या व्यक्तीविषयी जो विचार करतो तो विचार त्या व्यक्तीच्या अंर्तमनाला तरंगाच्या रुपाने पोहचतो. व ती व्यक्ती तुमच्याशी तसाच व्यवहार करते. म्हणून मनातील विचार बदला म्हणजे आयुष्य बदलेल . गौतम बुद्ध म्हणतात जसा तुम्ही विचार कराल तसेच तुम्ही व्हाल. सर्व विश्व तरंग आहे . ज्या प्रकारचा तुम्ही विचार कराल त्या तरंगाची तुम्ही निर्मीती कराल . त्या प्रकारच्या तरंगाशी तुम्ही ट्युनअप व्हाल . म्हणून सकारात्मक विचार करा त्यामुळे चांगल्या व्यक्ती व चांगल्या स्थितीला तुम्ही आकर्षित कराल .

- डॉ. दत्ता कोहिनकर ( माईन्ड पाॅवर ट्रेनर) 

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक