शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
4
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
5
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
6
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
7
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
8
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
9
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
10
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
11
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
12
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
13
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
14
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
15
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
16
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
17
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
18
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

GudhiPadwa : मित्र-मैत्रिणींना, प्रियजनांना 'या' मेसेजेसने द्या गुढीपाडव्याच्या शुभेच्छा!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2020 9:29 AM

घरातून बाहेर न पडता तुम्ही आपल्या प्रिय व्यक्तींना मॅसेज पाठवून शुभेच्छा देऊ शकता.  

गुढीपाडवा हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला साजरा केला जातो. हिंदू वर्षातील हा पहिला दिवस आहे. पुराणात सांगितलेल्या साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त. या दिवशी महाराष्ट्रात लोक घरासमोर गुढी उभारतात. महाराष्ट्रात हा सण मोठ्या प्रमाणात साजरा होतो. पण सध्या कोरोना व्हायरसच्या पाश्वभूमीवर  गुढीपाडवा आपल्याला साजरा येणार नाही.  म्हणजेच घराबाहेर पडता येणार नाही अशा स्थितीत तुम्ही  आपल्या प्रिय व्यक्तींना मॅसेज पाठवून शुभेच्छा देऊ शकता.  

चैत्राची सोनेरी पहाट, नव्या स्वप्नांची नवी वाट, नवा आरंभ, नवा विश्वास, नव-वर्षाची हीच तर खरी सुरुवात! गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

नवीन वर्षाची नवी ही सुरुवात, सुरुवात करु नवीन क्षणांची, या मंगल दिनाच्या तुम्हांला हार्दिक शुभेच्छा!

श्रीखंड पुरी, रेशमी गुढी, लिंबाचे पान, नव वर्ष जावो छान! गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

शांत निवांत शिशीर सरला, सळसळता हिरवा वसंत आला, कोळीळेच्या सुरुवाती सोबत, चैत्र-पाडवा दारी आला! गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

स्वागत नव वर्षाचे, आशा – आकांक्षांचे, सुख – समृद्धीचे, पडता पाऊल दारी गुढीचे, गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

भल्या सकाळी, गुढी उभारू, नवं वर्षाचे करू स्वागत, सामील होऊ शोभायात्रेत, आनंदाची उधळण करीत…“गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा”.

मिळूनी आपण गुढी उभारू, होऊनी सारे एक, सर्वीकडे पोचवू आपण, पर्यावरणाचा संदेश…गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

सर्व रस्ते सजले आहेत, छान सुंदर रांगोळ्यांनी,  शोभा यात्रा फुलुनी गेली, माणसांच्या ताटव्यानी….“गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा”.

झाड तोडूनी, प्रदूषण वाढवूनी, काय कोणी मिळविले? पूर, दुष्काळ, वादळात सर्वस्व गमाविले…….थांबुवया हे सारे आपण, करुनी पुन्हा वृषारोपण,  झाडे लावू, झाडे जगवू, वसुंधरेला पुन्हा सजवू, पर्यावरणाच्या गुढीसंगे, करू नववर्षाचे स्वागत…“गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा”.

चला उभारू पुन्हा आता, पर्यावरणाची गुढी, स्वागत करू नववर्षाचे, पोचवू हा संदेश घरोघरी….“गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा”.

सोनपिवळ्या किरणांनी आले नववर्ष, मराठी मन्मनी दाटे नववर्षाचा हर्ष…गुढीपाडव्याच्या सोनपिवळ्या शुभेच्छा!

सोनपिवळा स्पर्श, हिरव्या गर्दिला स्रूजनांचा हर्ष, कुणाच्या स्वागता हा सोहळा?, गुढीपाडव्याचा मुहुर्त आगळा, गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा! ( हे पण वाचा-Gudipadwa : घरच्याघरी साध्या पध्दतीने 'अशी' गुढी उभारून साजरा करा यंदाचा गुढीपाडवा!)

टॅग्स :gudhi padwaगुढीपाडवा