God helps the devotees from the beginning | भक्तीयोग्यांना देव आरंभापासून साहाय्य करतो
भक्तीयोग्यांना देव आरंभापासून साहाय्य करतो

ज्ञानयोग्यांना बरीच प्रगती झाल्याविना देव साहाय्य करत नाही; पण भक्तीयोग्यांना देव आरंभापासून साहाय्य करतो.  भक्तीयोगी भगवंताला सतत अनुभवत असल्याने भगवंताचे गुण भक्तीयोग्याला ज्ञानयोग्याच्या तुलनेत लवकर आत्मसात होतात. त्यामुळे भक्तीयोग्यांची तुलनेने जलद प्रगती होऊन त्यांना परमेश्वराशी लवकर एकरूप होता येते.

 भगवंताला जितके अनुभवण्याची क्रिया संबंधित साधकाकडून होते, त्यानुसार अनुभूती घेत घेत तो भगवंताच्या समीप जातो. भक्तीयोगी परमेश्वराला सतत आळवून, शरण जाऊन किंवा कृतज्ञ राहून आपल्यातील अहंचा लय करत जातात. यातून अन्य साधनामार्गाच्या तुलनेत भगवंताची कृपा संबंधित भक्तीयोग्यावर लवकर होते. ज्ञानामार्गाने साधना करतांना संबंधित योग्याचे चित्त भावमय होण्यास विलंब लागतो. त्यामुळे ज्ञानयोग्यांना अहं न्यून होण्यास भक्तीमार्गियांच्या तुलनेत वेळ लागतो.

ज्ञानयोगी परमेश्वराला साधनेच्या आरंभापासून ज्ञानाच्या माध्यमातून जाणण्याचा प्रयत्न करतात, तर भक्तीयोगी परमेश्वराविषयी आवश्यक ते ज्ञान झाल्यावर लगेचच भावाचा आधार घेतात. भक्तीयोगी भावाच्या माध्यमातून हळूहळू प्रत्यक्ष परमेश्वराचा अनुभव घेतात. अशा वेळी परमेश्वर भक्ताच्या भावामुळे त्याच्यासाठी जे काही करणे आवश्यक आहे, ते करू लागतो.


Web Title: God helps the devotees from the beginning
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.