Coconut Barfi : बाप्पाला नैवेद्य दाखवण्यासाठी नारळाची बर्फी नक्की ट्राय करा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2018 18:20 IST2018-09-11T18:04:45+5:302018-09-11T18:20:12+5:30
Ganesh Festival Special Receipe संपूर्ण देशभरात उत्साहात साजरा करण्यात येणारा उत्सव म्हणजे गणेशोत्सव. गणेश चतुर्थीच्या दिवशी मोठ्या भक्तीभावाने गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात येते.

Coconut Barfi : बाप्पाला नैवेद्य दाखवण्यासाठी नारळाची बर्फी नक्की ट्राय करा!
Ganesh Chaturthi 2018 : संपूर्ण देशभरात उत्साहात साजरा करण्यात येणारा उत्सव म्हणजे गणेशोत्सव. गणेश चतुर्थीच्या दिवशी मोठ्या भक्तीभावाने गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात येते. गणरायाला गोडाधोडाच्या पदार्थांचा नैवेद्य दाखवण्यात येतो. आज आम्ही तुम्हाला एका अशा मिठाईची रेसिपी सांगणार आहोत, जी तुम्ही घरच्या घरी सहज तयार करू शकता. जाणून घेऊयात घरच्या घरी नारळाची बर्फी तयार करण्याच्या रेसिपीबाबत. अशी नारळाची बर्फी जी खाताच तोंडात विरघळून जाईल...
साहित्य :
- खवलेलं खोबरं - 250 ग्रॅम
- साखर 200 ग्रॅम
- दूध अर्धा कप
- तूप 1 चमचा
- वेलची पूड अर्धा चमचा
- सुका मेवा (बारिक तुकडे)
कृती :
- एका बाउलमध्ये दूध घेवून त्यामध्ये साखर विरघळवून घ्या.
- त्यामध्ये खवलेलं खोबरं टाकून मिश्रण व्यवस्थित एकजीव करा.
- कढई गॅसवर ठेवून थोडी तापू द्या. त्यामध्ये तयार मिश्रण घालून थोडं शिजवून घ्या.
- मिश्रण जळणार नाही याची काळजी घ्या.
- मिश्रण व्यवस्थित एकजीव झाल्यानंतर त्यामध्ये वेलची पूड टाका आणि मिक्स करा.
- मिश्रण नीट एकजीव झाल्यानंतर थोडं घट्ट होऊ लागेल. त्यानंतर गॅस बंद करून कढई गॅसवरून उतरवा.
- एका ट्रेमध्ये किंवा ताटामध्ये तूप लावा आणि त्यामध्ये तयार मिश्रण टाका.
- त्या ताटामध्ये मिश्रण एका लेव्हलमध्ये पसरून घ्या.
- त्यानंतर ते ताट थोडा वेळ फ्रिजमध्ये ठेवा.
- बर्फी व्यवस्थित घट्ट झाल्यानंतर तिच्या वड्या पाडा.
- एका ताटामध्ये बर्फी घेवून त्यावर सुका मेवा टाकून नैवेद्य दाखवा.