शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
2
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
3
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
4
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
5
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
6
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
7
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
8
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
9
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
10
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
11
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
12
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
13
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
14
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
15
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
16
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
17
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
18
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
19
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
20
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप

जिकडे पाहावे तिकडे.... तु दिसशी नयना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2020 2:59 PM

निवृत्तीनाथांपासून सर्व संतांनी विश्र्वात्मक देवाचा अनुभव वर्णिला आहे

संतानी देव  नुसता अनुभवला नाही तर सवार्भूती परमेश्वर असल्याचे त्यांना जाणवले. मह्णूनच संत ज्ञानेश्वरांनी जे  जे भेटे भूत । ते ते वाटे मी ऐसे ।। असा संदेश दिला आहे. प्रत्येक प्राणिमात्रामध्ये ईश्वरांचा अंश असल्याचे संत एकनाथांना  जाणवले. त्यांनी प्रत्येक जीवाला परमेश्वराचे एक स्वरुप मानले आहे.  जे जे  भेटे भूत । ते ते  मानिजे भगवंत स्वस्वरूपाला प्रत्येक जीवांमध्ये पाहण्याची विश्वात्मकदृष्टी संतांकडे होती. संतांनी स्वत: विश्र्वात्मक ईवराची अनुभूती घेऊन त्याप्रमाणे आपल्या आचरणामध्ये त्या तत्वांचे अनुकरण केले आहे. ज्ञानेश्वरीच्या अखेरचे पसायदान  हे विश्र्वात्मक देवापाशी मागीतलेले आहे.  निवृत्तीनाथांपासून सर्व संतांनी विश्र्वात्मक देवाचा अनुभव वर्णिला आहे. आकाश जसे सर्वत्र आहे. तसा ईश्वर हा विश्र्वात्मक असून सर्वांना विश्वात्मक एकतेचे दर्शन घडवितो. त्याच एकात्मभावाचे दर्शन  विदर्भ पंढरीनाथ शेगावीचे अवलीया संत गजानन महाराज त्यांच्या अवतार कायार्तून घडवितात. संत जगाला समजावे म्हणून पंतोजी सारखे पाटी हाती घेऊन शिकवितात असे संत तुकाराम आपल्याला सांगतात-अर्भकाचे साटी ।  पंते हाती धरिली पाटी ।।तैसे संत जगी । क्रिया करुनी दाविती अगी ।।बाळकाचे चाली । माता जाणूनी पाऊल घाली ।।तुका म्हणे नाव । जनासाठी ठाव ।।

    माघ वदय सप्तमीला देविदास पातुरकरांच्या वाड्यासमोर उष्ट्या पत्रावळी  वरील भातांची शिते उचलून खाणारी उवलिया मुर्ती म्हणजे दुसरे तिसरे कोणीही नसून ते म्हणजे आपली सर्वांची माऊली अवलीया मूर्ती सद्गुरू गजानन महाराज होय. त्यांच्या प्राकट्याचे निमित्त जरी पातुरकरांच्या घरची हा ऋतुशांती कार्यक्रम असला तरी लोककल्याणाचे  कार्य करण्यासाठीच त्यांचे अवतार कार्य असल्याचे  महाराजांच्या अवलीया लिलांवरून दिसून येते. मनुष्याने धमार्ने वागावे यासाठी ते संकेत देतात. पांडुरंगाचा अवतार असणारा हा अवलीया बापुना काळेंना साक्षात विठ्ठलाचे दर्शन घडवितो. दासगणू महाराजांनी त्यांचे वर्णन गजानन विजय ग्रंथातून केले आहे. 

गजानन जे स्वरूप काही । ते विठ्ठलावाचून वेगळे नाही।।

     संत गजाननांनी भाविकांना दिलेला संदेश हा सत्कर्म करण्याचा आहे. त्यांनी प्रत्येक भाविकाच्या मनामध्ये भक्तीची गंगा निर्माण केली आहे. संतांजवळ परमेश्वराचा पत्ता आहे. त्याना शरण गेल्यांनंतर ते परमेश्वराची भेट घडवून देतात. मग ते सदगुरू स्वरूपात भेटतात तर कधी गुरूमाऊली म्हणून ओळख पटवितात. ओळख तो आवाज.. ओळख ती खूण ङ्घ  मी येथेच आहे .. तुज्या आसपास ङ्घ.. जणूकाही हा संदेश देतात की मी गेलो ऐसे मानु नका । भक्तीत अंतर करू नका ।। हा त्यांचा संदेश भक्तांना त्यांनी देवून जगण्याची शक्ती प्रत्येक भक्तांच्या मनात निर्माण केली आहे. तोच विश्वास घेवून आज प्रत्येक भक्त शेगावी गजाननाच्या दर्शनासाठी येतात. संत  भक्तांच्या मनीचा हेतू ओळखतात. भक्तांचे मनोरथ पूर्ण करण्याचे सामर्थ्य त्यांच्याकडे असते. भक्तांना अलौकिक भक्तीची अनुभूती ते सतत देत असतात. सदगुरू गजानन  महाराज प्रत्येकाला जणू आपले मनातील ईश्वर वाटतात. संत जन्मोजन्मी भक्तीचे कार्य करीत आले आहेत. भक्तांचे भवदु:ख हरण्याचे सामर्थ्य त्यांच्याठायी असते.फक्त प्रत्येकाच्या भक्ती, विश्वास व श्रद्धा  यावर ते  अवलंबून आहे.  

मागा बहूता जन्मी । हेचि करित आलो आम्ही ।भवतापश्रमी । दु:खे पीडिली निववू त्यां ।गर्जू हरिचे पवाडे । मिळवू वैष्णव बागडे ।पाझर रोकडे । काढू पाषाणामध्ये ।।

सदगुरूचे चिंतन केल्याने त्रिविध ताप हरण्याचे सामर्थ्य त्यामध्ये आहे. नाहीतर आज सर्वत्र स्वाथार्चे वातावरण आहे. लाडू पेढे खावयास लोक जमती विशेष । परी सहाय्य संकटास कोणीही करीना ।। तेव्हा सदगुरू गजाननच आपल्या मदतीला धावल्याचे अनेकांच्या अनुभवावरून आपल्यायाला जाणवते. आज गजानन महाराज संस्थान मध्ये कर्मयोगी शिवशंकरभाऊ पाटील यांच्या मार्गदर्शनामध्ये 42 सेवा प्रकल्पाद्वारे गजाननाची सेवाकरीत आहेत भक्त हाच माझा भगवंत असे त्यांचे ब्रीद आहे.

चिंतनाची जोडी । हाचि लाभ घडोघडीतुम्ही वसोनी अंतरी । मज जागवा निधार्री

 

- प्रा. डॉ. हरिदास आखरे

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकspiritualअध्यात्मिकGajanan Maharajगजानन महाराज