Freedom is the salvation | स्वातंंत्र्य हाच मोक्ष

स्वातंंत्र्य हाच मोक्ष

- बा.भो. शास्त्री

चार्वाक हा मोठा दार्शनिक होता. आत्मा-परमात्मा याचं अस्तित्व त्याला मान्य नव्हतंं. आस्तिकांना अभिप्रेत असलेला मोक्ष त्याला मान्य नव्हता. स्वातंत्र्य हाच मोक्ष ही त्याची धारणा होती. प्रत्यक्ष हे एकच प्रमाण त्याला मान्य होतंंं. मृत्यूपर्यंतचा जीवनप्रवास सुखकर कसा होईल म्हणून त्याने आपले विचार मांंडले आहेत. त्यात स्वातंंत्र्याबद्दल बोलताना तो म्हणतो,
स्वतंंंत्रता मोक्ष परतंत्रता: बंध:
स्वातंत्र्य हाच मोक्ष व पारतंत्र्य हेच बंंधन आहे. उजाड वैराण वाळवंंटात एखाद्या पाण्याच्या झऱ्यासारखा हा श्लोक स्वामींना वाटला असावा. गुणग्राही सर्वज्ञांंनी त्याचे सार मराठी सूत्रात ओतले. ही त्यांच्या हृदयाची विशालता आहे. मोक्ष म्हणजे मोकळा. कशातून? अज्ञानातून. जाचक बंंधनातून. दु:खातून मुक्ती... हाच तो मोक्ष. एक भौतिक, एक आध्यात्मिक असे छोटे-मोठे भौतिक मोक्ष खूप आहेत. ‘सुटलो बुवा एकदाचे’ असं आपण म्हणतो तेव्हा तो छोटा मोक्ष असतो. रविवारची सुट्टी हा लहान मोक्षच आहे. बंंधन हेच नरक. आत्यंतिक दु:ख निवृत्ती व परमानंंंदाची प्राप्ती हाच अंतिम मोक्ष आहे. तो स्वामींना अभिप्रेत आहे. सर्वज्ञांनी या सूत्राचंं मराठीकरण केलंं. ‘स्वातंंत्र्य हा मोक्ष पारतंत्र्य हा बंंध’ असं हे गोड सूत्र आहे. जीवन जगण्यासाठी पशुपक्ष्यांंचंंं सीमित तंत्र असतंं. आहार, निद्रा, भय व मैथुन यापलीकडे त्यांंना काहीच कळत नाही. कारण ते जीवन चाकोरीबद्ध असतंं. त्यात विकास व गतीचा विचार नसतोच. स्वातंत्र्याने माणसाचा विकास होतो व परतंंत्राने विनाश होतो. जाचक पारतंंत्र्य झुगारून देण्यासाठी आपण संंंघर्ष करतो. रक्त सांंडतो. स्वातंत्र्याबद्दलच्या लोकमान्यांंच्या विधानांना चार्वाकाच्या सूत्राचा आधार असण्याची शक्यता कशी नाकारता येईल? कर्म, धर्म, जात, नाते, प्रांंत या बाह्य बंधनाच्या आपण अधीन असतोच; पण अंंतर्गतही षड्विकाराचे, वासनेचे बंंंधन असतेच.

Web Title: Freedom is the salvation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.