शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
6
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
7
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
8
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
9
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
10
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
11
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
12
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
13
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
14
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
15
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
16
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
17
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
18
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
19
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा

अजुनी येतो वास फुलांना, अजुनी माती लाल चमकते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2019 01:48 IST

अगदी काल-परवाच शरीराला दरदरून घाम फोडणारी, मनाला आतून हादरवून टाकणारी आणि जगण्या-मरण्याच्या सीमारेषा पुसट करणारी घटना माझ्या मित्रांच्या जीवनात घडली.

- प्रा. शिवाजीराव भुकेले

अगदी काल-परवाच शरीराला दरदरून घाम फोडणारी, मनाला आतून हादरवून टाकणारी आणि जगण्या-मरण्याच्या सीमारेषा पुसट करणारी घटना माझ्या मित्रांच्या जीवनात घडली. मित्राची समजूत नेमकी कशी काढावी हे मलाही सुचेनासे झालेय. त्याच्या एकुलत्या एक ‘अमर’ नावाच्या मुलाने आपल्या हॉस्टेलवरील राहत्या खोलीत आत्महत्या केली अन् पाटील कुटुंबीयांच्या जीवनात अंधार दाटून आला. अमर स्कॉलर होता, शालीन होता. हरहुन्नरी होता. प्रेम प्रकरण वगैरे गोष्टीत तितकासा रस घेणारा नव्हता. फक्त खूपच मनस्वी होता.

दारिद्र्याचे आकाश माथ्यावर पेलणाऱ्या त्याच्या बाबाने व दुसºयाच्या शेतात मोलमजुरी करणा-या आईने अमरला डॉक्टर करायचेच, असा संकल्प केला होता. अमरही तसा प्रतिसाद देत होता. मग असे अचानक काय झाले की, अमरचा आयुष्यावरचा विश्वासच उडून गेला. तर म्हणे अमरचा त्या दिवशी मित्रांच्याकडून ‘शेळपट आयुष्य जगणारी शेळी’ अशा शेलक्या शब्दांत अपमान झाला, म्हणून अमरने असा टोकाचा निर्णय घेतला. एक अमर एकदाच गेला, पण असे हजारो अमर आयुष्याकडे अत्यंत अल्प दृष्टीने पाहत आहेत. त्यामुळे अकाली आयुष्याचा अंत करीत आहेत.

आयुष्याच्या वाटेवरून चालता-चालता पाय रक्तबंबाळ झाले, तरी तुकोबासारखे आनंदयात्री म्हणत होते,दिले इंद्रिय हात पाय कान। डोळामुख बोलाया वचन।जेणे तू जोडीसी नारायण।नासे जीवपण भवरोग।।आपले आयुष्य हीच विद्या त्याने दिलेली सर्वांत मोठी देणगी आहे. हा संतांचा मनोमन विश्वास होता, म्हणूनच आपल्या दीर्घ दृष्टीने ते समाजावर दीर्घकाल टिकणारे संस्कार करू शकले. वाºयाच्या एका झुळकेबरोबर प्राजक्ताच्या फांद्या हलाव्यात अन् अंगणात प्राजक्ताच्या फुलांचा सडा पडावा, तसे दुसºयाच्या जीवनात सुगंध पसरविणारे जिणं ज्ञानेश्वर, बुद्ध, कबीर, तुकाराम, महावीर, विवेकानंद यांच्या वाट्याला आले. कवितेच्या एका-एका कडव्यातील आनंदाने बेभान होत जाऊन द्रष्ट्या कवीने दुसºयाच्या जीवनात आनंदाचे चांदणे शिंपीत जावे, तसे हे सारे युगा-युगाचे आनंदयात्री आमच्या आयुष्यात आनंदाचे चांदणे शिंपीत गेले, पण आम्ही मात्र अल्प दृष्टीची माणसे जीवनातील अल्पविरामाकडेच पाहात बसलो. त्याची दीर्घता आमच्या लक्षात आणून देण्यासाठीच मर्ढेकर म्हणाले होते,अजुनी येतो वास फुलांना, अजुनी माती लाल चमकते।अजुनी सुरट्या बांधावरती। चढुनी बकरी पाला खाते।।

दारिद्र्य व सामाजिक उपेक्षेचे वाळवंट तुडवीत असतानासुद्धा संत नामदेवांसारखे आंतरभारतीचे जनक आपले आयुष्य म्हणजेच विधात्याने दिलेला प्रसाद आहे, असे मानत होते. म्हणूनच नामदेवांनी पंजाबमध्येसुद्धा भक्तिभावाची प्रसन्न पौर्णिमा सर्वसामान्यांच्या जीवनात निर्माण केली. माणसाचं जगणं हाच मुळात ऊन -पावसाच्या चैत्रपालवीचा खेळ आहे. कधी ते सुखाच्या सागराने हिंदोळे घेऊ लागते, तर कधी दु:खाचे वैराण वाळवंट तुडवावे लागते; परंतु यातही जगण्याची एक रग आहे. नवनिर्मितीची धग आहे, म्हणून बहिणाबाई म्हणाल्या होत्या,जग जग माझ्या जीवा। असं जगणं मोलाचं ।।उच्च गगनासारखं। धरतीच्या र तोलाचं।।

टॅग्स :spiritualअध्यात्मिक