शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

विश्वास हा नात्यातला व प्रामाणिकपणाचा प्राण

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2019 8:30 AM

कोणत्याही नात्यात विश्वास महत्त्वाचा असतो. सर्व जग विश्वासावर अवलंबून आहे. विश्वास हा नात्यातला व प्रामाणिकपणाचा प्राण आहे. विश्वासातून सामर्थ्य वाढते.

कोणत्याही नात्यात विश्वास महत्त्वाचा असतो. सर्व जग विश्वासावर अवलंबून आहे. विश्वास हा नात्यातला व प्रामाणिकपणाचा प्राण आहे. विश्वासातून सामर्थ्य वाढते. सामर्थ्यशाली माणूस विश्वासू असतो. विश्वासाने जग जिंकता येते. विश्वासातून आत्मस्फूर्ती मिळते. विश्वास मानवी जीवनाचा एक घटक आहे. कोणतेही कार्य करताना त्याच्या मनात विश्वास पक्का असावा. विश्वासामुळेच सफलता प्राप्त होते. विश्वास माणसाला नवसंजीवनी देतो. विश्वासामुळेच आपले कार्य यशस्वी होते. स्वत:चा स्वत:वर विश्वास असणे गरजेचे असते. स्वत:चा विश्वास पक्का असला की कोणतेही काम आपण तडीस नेतो. विश्वासातून एक आत्मऊर्जा मिळते. प्रेरणा-स्फूर्तीचा उद्गाता विश्वास आहे.विश्वासातून मानवी मनाची सचोटी लक्षात येते. धाडसी निर्णय घेण्याची क्षमता विश्वासात असते. विचारांची प्रगल्भता विश्वासातून निर्माण होते. आपली कार्यक्षमता विश्वासावर निर्भर असते. विश्वासू माणसे लोकप्रिय होतात. कोणत्याही क्षेत्रात सर्वोच्च शिखर गाठायचे असेल तर त्या व्यक्तीचा विश्वास श्रेष्ठ ठरतो. जीवनाची धारा बनून विश्वास कार्य करीत असतो. विश्वामध्ये मानव-समाजाचा विकास व कार्यप्रणाली अवलंबून आहे. बुद्धिबळ, ज्ञानबल, जनबल, शरीरबल, धनबळ, मनोबल, पदबळ, राजबळ इत्यादींमधूनही विश्वास जपला जातो. मानव व मानवता याची रक्षा विश्वासातून होते. विश्वासातून विचार, वचन आणि कर्म दिव्यतेकडे जातात. जीवनाला उत्तम गती विश्वासातून प्राप्त होते.मानवी जीवनात सदाचारतेचा संचार विश्वासामुळे होतो. एखादा महामानव जनतेला ऐश्वर्यशाली बनवतो ते त्यातल्या विश्वासामुळे. भयंकर कठीण परिस्थितीमध्ये साथ देतो तो विश्वास, विघ्न-बाधा आली की विश्वास धैर्य देतो. मनुष्याला महान कार्य करण्यास प्रवृत्त करतो तो विश्वासच असतो. विश्वासामुळे माणसे राज्य-साम्राज्य उभी करतात. डोंगराएवढ्या संकटाला तोंड देण्याची हिंमत विश्वासात आहे. जीवनात हानी-लाभ, जय-पराजय, जीवन-मरण, सफलता-विफलता, मान-अपमान, धर्म-अधर्म, विद्या-विज्ञान, ज्ञान-अज्ञान या सर्वांमध्ये विश्वासाला तडा जाऊ देऊ नये, विश्वासू माणूस स्थिर असतो. ज्या माणसांमध्ये धैर्य, साहस आणि विवेक यांचा समन्वय असतो. ज्या माणसांमध्ये धैर्य, साहस आणि विवेक यांचा समन्वय असतो त्याचे कारण त्यांच्यामधला विश्वास. ज्यांचा स्वत:वर विश्वास नसतो ते माणसे भेकुडे असतात.काहीही आपत्ती आली की लगेच घाबरतात. आत्मग्लानी आल्यास तिला झटकून टाकले पाहिजे. त्यासाठी विश्वास फार महत्त्वाचा आहे. म्हणून एका गीतात म्हटले आहे, ‘इतनी शक्ती हमे देना दाता मन का विश्वास कमजोर हो ना’ मनातला विश्वास कायम बहरला पाहिजे. विश्वासामुळेच माणसे निर्भय व नि:संशयी असतात.

डॉ. तुळशीराम गुट्टे महाराज

(संत साहित्याचे अभ्यासक व सिद्धिविनायक मानव कल्याण मिशनचे अध्यक्ष)

 

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक