विश्वास हा नात्यातला व प्रामाणिकपणाचा प्राण

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2019 08:30 AM2019-08-19T08:30:13+5:302019-08-19T08:30:50+5:30

कोणत्याही नात्यात विश्वास महत्त्वाचा असतो. सर्व जग विश्वासावर अवलंबून आहे. विश्वास हा नात्यातला व प्रामाणिकपणाचा प्राण आहे. विश्वासातून सामर्थ्य वाढते.

Faith is the Soul of love and honesty | विश्वास हा नात्यातला व प्रामाणिकपणाचा प्राण

विश्वास हा नात्यातला व प्रामाणिकपणाचा प्राण

Next

कोणत्याही नात्यात विश्वास महत्त्वाचा असतो. सर्व जग विश्वासावर अवलंबून आहे. विश्वास हा नात्यातला व प्रामाणिकपणाचा प्राण आहे. विश्वासातून सामर्थ्य वाढते. सामर्थ्यशाली माणूस विश्वासू असतो. विश्वासाने जग जिंकता येते. विश्वासातून आत्मस्फूर्ती मिळते. विश्वास मानवी जीवनाचा एक घटक आहे. कोणतेही कार्य करताना त्याच्या मनात विश्वास पक्का असावा. विश्वासामुळेच सफलता प्राप्त होते. विश्वास माणसाला नवसंजीवनी देतो. विश्वासामुळेच आपले कार्य यशस्वी होते. स्वत:चा स्वत:वर विश्वास असणे गरजेचे असते. स्वत:चा विश्वास पक्का असला की कोणतेही काम आपण तडीस नेतो. विश्वासातून एक आत्मऊर्जा मिळते. प्रेरणा-स्फूर्तीचा उद्गाता विश्वास आहे.

विश्वासातून मानवी मनाची सचोटी लक्षात येते. धाडसी निर्णय घेण्याची क्षमता विश्वासात असते. विचारांची प्रगल्भता विश्वासातून निर्माण होते. आपली कार्यक्षमता विश्वासावर निर्भर असते. विश्वासू माणसे लोकप्रिय होतात. कोणत्याही क्षेत्रात सर्वोच्च शिखर गाठायचे असेल तर त्या व्यक्तीचा विश्वास श्रेष्ठ ठरतो. जीवनाची धारा बनून विश्वास कार्य करीत असतो. विश्वामध्ये मानव-समाजाचा विकास व कार्यप्रणाली अवलंबून आहे. बुद्धिबळ, ज्ञानबल, जनबल, शरीरबल, धनबळ, मनोबल, पदबळ, राजबळ इत्यादींमधूनही विश्वास जपला जातो. मानव व मानवता याची रक्षा विश्वासातून होते. विश्वासातून विचार, वचन आणि कर्म दिव्यतेकडे जातात. जीवनाला उत्तम गती विश्वासातून प्राप्त होते.

मानवी जीवनात सदाचारतेचा संचार विश्वासामुळे होतो. एखादा महामानव जनतेला ऐश्वर्यशाली बनवतो ते त्यातल्या विश्वासामुळे. भयंकर कठीण परिस्थितीमध्ये साथ देतो तो विश्वास, विघ्न-बाधा आली की विश्वास धैर्य देतो. मनुष्याला महान कार्य करण्यास प्रवृत्त करतो तो विश्वासच असतो. विश्वासामुळे माणसे राज्य-साम्राज्य उभी करतात. डोंगराएवढ्या संकटाला तोंड देण्याची हिंमत विश्वासात आहे. जीवनात हानी-लाभ, जय-पराजय, जीवन-मरण, सफलता-विफलता, मान-अपमान, धर्म-अधर्म, विद्या-विज्ञान, ज्ञान-अज्ञान या सर्वांमध्ये विश्वासाला तडा जाऊ देऊ नये, विश्वासू माणूस स्थिर असतो. ज्या माणसांमध्ये धैर्य, साहस आणि विवेक यांचा समन्वय असतो. ज्या माणसांमध्ये धैर्य, साहस आणि विवेक यांचा समन्वय असतो त्याचे कारण त्यांच्यामधला विश्वास. ज्यांचा स्वत:वर विश्वास नसतो ते माणसे भेकुडे असतात.

काहीही आपत्ती आली की लगेच घाबरतात. आत्मग्लानी आल्यास तिला झटकून टाकले पाहिजे. त्यासाठी विश्वास फार महत्त्वाचा आहे. म्हणून एका गीतात म्हटले आहे, ‘इतनी शक्ती हमे देना दाता मन का विश्वास कमजोर हो ना’ मनातला विश्वास कायम बहरला पाहिजे. विश्वासामुळेच माणसे निर्भय व नि:संशयी असतात.

डॉ. तुळशीराम गुट्टे महाराज

(संत साहित्याचे अभ्यासक व सिद्धिविनायक मानव कल्याण मिशनचे अध्यक्ष)

 

Web Title: Faith is the Soul of love and honesty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.