शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

मन आपल्या ताब्यात ठेवून विकारांवर विजय मिळवणे सोपे...  

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2019 21:02 IST

सर, माझा नवरा अभय याची आत्तापर्यंत चार प्रेमप्रकरणे पकडली...

डॉ.दत्ता कोहिनकर-          

पेपरमध्ये माझे अनेक लेख शिल्पाने वाचले होते. फोनवर झालेल्या संभाषणानुसार शिल्पा मला भेटायला आली होती. दिसावयास अत्यंत देखणी, सालस व निरागस असलेल्या शिल्पाचा चेहरा भलताच पडला होता. चेहर्‍यावर व्याकुळता व खिन्नता जाणवत होती. माझ्या थोडयाफार झालेल्या कौन्सेलिंगच्या अभ्यासानुसार मी तिला बोलते केले. शिल्पाच्या डोळयातून अश्रु गळू लागले. ती म्हणाली,सर, माझा नवरा अभय याची आत्तापर्यंत चार प्रेमप्रकरणे* मी पकडली, प्रत्येक वेळेस तो माफी मागून अगदी माझे पाय पकडतो व परत असे करणार नाही म्हणत मुलाबाळांची शपथ घेतो, परत वर्षभरातच ये रे माझ्या मागल्या ची स्थिती पाहायला मिळते.  सर, मुलं लहान आहेत, मी खानदानी कुटूंबात वाढलीये. घटस्फोट पण घेता येत नाही म्हणून मला नैराश्य आलंय. सर.. मला सांगा अभयला मी काहीही कमी पडू देत नाही, तो ही माझ्यावर खूप जिवापाड प्रेम करतो. तरी तो असा का वागतो ?*सर सांगा हा कधी सुधारणार* ? त्यावेळेस मी शिल्पाला थोडं रिलॅक्स होण्यासाठी 10 मी. श्‍वासावर लक्ष देऊन ध्यान करावयास लावले व तिला सांगीतले. निसर्गतः *पुरूषांच्या शरीरात टेस्टेस्टोरॉन नावाचे संप्रेरक त्याच्या कामभावना सतत उत्तेजित करत असते* हे संप्रेरक स्त्रीयांच्या शरीरात खूप कमी प्रमाणात असते. *स्त्रीला प्रेम, स्पर्श, आधार, आपलेपणा यात जास्त रस असतो. तर पुरूषांना प्रणयात जास्त रस असतो. पुरूषांच्या शरीरात टेस्टेस्टोरॉनची 24 तासात 4 ते 5 वेळा लाट स्त्रावते. 37 % *पुरूष दर तीस मिनिटांनी सेक्सचा विचार करतात. त्याला कारण शरीरात तयार होणारा टेरेस्टोरॉनचा स्त्राव*. 

मेंदूमध्ये हायपोथॅलमस नावाचा जो भाग असतो. त्यात प्रणयाचं उगमस्थान असते. हा पुरूषांमध्ये बायकांपेक्षा जास्त मोठा असतो. त्यामुळे पुरूषांमध्ये प्रणयभावना प्रचंड असते. प्रत्येक पुरूषांचा विकारांचा साठा, झालेले संस्कार यावर बर्‍याचशा गोष्टी अवलंबून असतात. बाहेरख्यालीपणा हा गुण बर्‍याचशा पुरूषांमध्ये जन्मानुजन्मी आलेला असतो. पुर्वी पुरूष युध्दाला गेले की, मोठया प्रमाणात मारले जायचे. त्यामुळे विधवांची संख्या जास्त असायची, म्हणून जमातीच्या अस्तीत्वासाठी त्यावेळी पुरूषांनी जनानखाना बाळगण्याची प्रथा सुरू केली होती. त्यामुळे एक पुरूष अनेक स्त्रीया हा पुर्वसंस्कार जन्मानुजन्मी पुढे आलेला असतो. पुरूषांची प्रणयभावना इतकी प्रबळ असते कि *8% पुरूष हे प्रणयाच्या नशेवरच जगतात*. *बर्‍याच पुरूषांना निसर्गतः प्रणयात विविधता हवी असते. त्याच्या मेंदूतील ही खळबळ सारखी विविधता बाहेर शोधत असते. म्हणून बरेचसे पुरूष बाहेरख्याली असतात*. यावर उपाय म्हणजे त्याच्या शरीरात निर्माण होणार्‍या टोरेस्टोरॉन संप्रेरकाची लाट व प्रबळ कामभावनेचे वारंवार येणारे विचार याला साक्षीभावाने संवेदनांच्या आधारावर मन समतेत ठेवून जाणणे. यामुळे विकारांना वश करून त्यांचे मुळासकट निर्मुलन करता येते. सिध्दार्थ गौतम बुध्दांनी 2,500 वर्षांपूर्वी यावर निसर्गाचा संपूर्ण अभ्यास करून मनाला सबल व निर्मल करून मनाचे मालक बनण्याची साधना 'विपश्यना' शोधून काढली. ज्यामुळे विकारांवर ताबा मिळवता येतो.विकारांचे आपण मालक होतो. शिल्पा विपश्यनेच्या या दहा दिवसांच्या शिबिराला अभयला बसव. शिल्पा लगेच तयार झाली व दोघेही दहा दिवसीय विपश्यनेच्या शिबिरात सामील झाले. शिबिरानंतर रोज सरावाने त्यांच्यातील भांडणे संपली, घरात शांती आली व आता मात्र *मनातील विकारांकडे साक्षीभावाने पाहून मन वश करण्याची कला अभय शिकल्यामुळे त्यांचे एकपत्नीव्रत सहज व सोपे झाले. आज दोघेही आनंदात संसार करत आहे. अशा अनेक स्रिया नवर्‍याच्या बाबतीत सर, हा कधी सुधारणार ? असा प्रश्‍न करतात. सगळयांना माझे उत्तर मात्र एकच असते, विपश्यनेच्या शिबिरानंतर विशेष म्हणजे हे दहा दिवसीय निवासी शिबिर पूर्णतः विनामूल्य असते. यामुळे मन आपल्या ताब्यात ठेवून विकारांवर विजय मिळवणे सोपे होते. आपण मनाचे मालक होतो.व मर्कट मन जोडीदाराशी प्रामाणिक व सुखी राहते. दोघेही एकमेकांपासून संतुष्ट असतात. 

टॅग्स :PuneपुणेAdhyatmikआध्यात्मिकrelationshipरिलेशनशिप