शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
5
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
6
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
7
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
8
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
9
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
10
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
11
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
12
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
13
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
14
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
15
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
16
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
17
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
18
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
19
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
20
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक

... आणि तो मोकळा झाला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2019 20:22 IST

नकारात्मक विचारांमुळे शरीरात संप्रेरकांचे असंतुलन झाले व स्वभावधर्माच्या विरोधात अर्थात निसर्गाच्या विरोधात गेल्यामुळे अक्षयला डिप्रेशन आले होते. 

-डॉ. दत्ता कोहिनकर 

              एकदा अक्षय भेटायला आला. मला म्हणाला, एका मुलीबरोबर माझे प्रेमसंबंध होते पण तिच्या घरच्यांनी तिचे लग्न बळजबरीने त्यांच्याच नात्यातील एका मुलाबरोबर लावून दिले. हे दु:ख विसरण्यासाठी मी एका गुरूच्या आश्रमात गेलो तेथे त्यांनी मला दीक्षा दिली.  आता आश्रमातच राहतो व अजपाजप गुरूमंत्र म्हणतो. मला आश्रमाच्या चौकटीत-नियमात रहावे लागते. नकारात्मक विचारांमुळे शरीरात संप्रेरकांचे असंतुलन झाले व स्वभावधर्माच्या विरोधात अर्थात निसर्गाच्या विरोधात गेल्यामुळे अक्षयला डिप्रेशन आले होते. मित्रांनो आपल्या मनात अनेक इच्छा, वासना, प्रेरणा, नैसर्गिक स्वरूपात निर्माण होतात. आपण त्या इतरांपुढे व्यक्त करणे शिष्टसंमत नसल्यामुळे दाबून टाकतो. आपण दडपलेल्या इच्छा सहजासहजी नष्ट होत नाहीत. स्वत:चे अस्तित्व दाखवण्यासाठी त्या वारंवार प्रकट मनाकडे झेपावत राहतात. पण दडपणामुळे - सामाजिक बंधनाच्या अविवेकी दृष्टीकोनामुळे, प्रकट मन त्या इच्छांना ठोकरत व त्यांचे दमन होते.  दमन केल्यावर त्या मनातून नाहीशा झाल्या अशी चुकीची आपली समजुत असते.                 प्रत्येक व्यक्ती ही कुठल्या ना कुठल्या इच्छांच दमन करत असते. हे दमन खूप तीव्र प्रमाणात व अजाणता असेल तर ते अबोध मनाला न जुमानता संधी मिळताच मनोविकृतीच्या रूपाने वर येते. मनोविश्लेषणशास्त्राच्या नुसार मानसिक विकृतीचे मुळ हे प्रामुख्याने  अबोध मनात दडपलेल्या कामभावना व आक्रमक भावनेत असते. अक्षय हा मुळातच अध्यात्मिक प्रवृत्तीचा नव्हता. तो अपघाताने अध्यात्यात - आश्रमात आला होता. आश्रमात त्याने सर्व भावभावना दाबून टाकल्या होत्या. त्यामुळे दबलेली उर्जा - केमिकल लोच्याच्या रूपाने अक्षयला नैराश्याकडे घेऊन गेली होती.              मी अक्षयला जे वाटतंय ते बिनधास्त बोलायला लावलं. त्याला आश्रमातून काही दिवस बाहेर पडून सिनेमा, मित्रमंडळी, मैत्रिणी, सहल, उत्तम आहार, योगा, प्राणायाम, ध्यान, यात सामील व्हायला  लावलं व सर्व भावभावनांच व्यवस्थापन शास्त्र सांगितलं. अविवाहीतांसाठी हस्तमैथून हा वासनापूतीर्चा व ताणतणाव निवारणाचा योग्य मार्ग आहे. फक्त त्याचा अतिरेक होता कामा नये. त्याने कसलाही अपाय होत नाही हे त्याला समजावून सांगितले. विचाराचे महत्व सांगताना, नकारात्मक विचार नकारात्मक तरंगाशी आपल्याला जोडतो व नकारात्मक विचारामुळे अहितकारक स्त्राव, उच्चरक्तदाब यामुळे आपली हानी कशी होते हे पटवून दिले व नकारात्मक विचारांना सकारात्मक करून मनाला सकारात्मक विचारांचे खाद्य (स्वसंवाद) दयावयास सांगितले व १० दिवशीय विपश्यना शिबिरात बसवले. शिबीरानंतर अक्षय मोकळा झाला.  आज तो नोकरी करून मजेत जगतोय. नुकतेच त्याचे लग्न ठरलेय. पत्रिकेत गुरूवर्य म्हणून प्रेषकाच्या कॉलममध्ये माझे नाव झळकत आहे.

टॅग्स :Mental Health Tipsमानसिक आरोग्यMeditationसाधना